इक्विटी गुंतवणूकदार सहसा बाजारात पैसे गमावू नयेत याबाबत अधिक जागरूक असतात. तर दुसरीकडे स्मार्ट गुंतवणूकदार, पैशांची बचत आणि दीर्घकालीन दृष्टीकोनातून गुंतवणूक करण्याबाबत सजग असतात. अशा सजग आणि टॅक्स वाचवू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) एक चांगली संधी आहे. ELSS हा म्युच्युअल फंडमधील असा एक प्रकार आहे. जे त्यांचा बराचसा निधी इक्विटी किंवा इक्विटीशी संबंधित प्रॉडक्टमध्ये गुंतवणूक करतात. तुम्ही ELSS बद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल तर आम्ही तुम्हाला ELSS फंड निवडण्याची 5 प्रमुख कारणे सांगणार आहोत.
कर लाभ (Tax Benefit)
ELSS मध्ये गुंतवणूक करण्याचे सर्वांत पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे टॅक्स वाचवणे. ELSS मधील गुंतवणूक 1961च्या आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे. पण गुंतवणूकदाराला कंपनीकडून मिळालेला लाभांश आणि दीर्घकालीन भांडवली नफा यावरच सूट देण्यात आली आहे. ELSS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या करपात्र उत्पन्नातून 1.5 लाख रूपयांपर्यंतची कर सवलत घेऊ शकता.
लॉक इन कालावधी (Lock in period)
म्युच्युअल फंडमध्ये दीर्घ गुंतवणुकीसाठी अनेक चांगले फंड उपलब्ध आहेत. पण त्यांना लॉक इन पीरिअड नसल्याने त्यातील गुंतवणूक काढण्यासाठी तुम्ही प्रेरित होऊ शकता. पण ELSS मध्ये गुंतवलेली रक्कम किमान 3 वर्षांसाठी लॉक इन पीरिअडमध्ये असते. म्हणजेच ELSS फंडमध्ये तुम्ही रिटर्नवर लागू होणाऱ्या करांमधून सूट देण्यासाठी 3 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक करण्यास बांधिल राहता. यामुळे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याची चांगली सवय लागते.
दीर्घकालीन मुदतीचा लाभ घ्या (Ride the long term value growth)
ELSS साठी लॉक इन कालावधी 3 वर्षांचा आहे. पण तुम्हाला तो अजून वाढवायचा असेल तर तुम्ही तो तसाच ठेवू शकता किंवा 3 वर्षानंतर रिडीम करू शकता. इक्विटीमधील गुंतवणूक ही बाजाराच्या नियमानुसार जोखीम मानली जाते. पण त्याच इक्विटीमध्ये गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला टॅक्स सवलतीसह अधिकाधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.
बचतीची सवय लावा (Inculcate saving habit)
ईएलएसएस म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही एसआयपी (SIP)द्वारे 500 रूपयांपासून गुंतवणूक करू शकता. प्रत्येक महिन्यातील 500 रूपयांची बचत कालांतराने मोठी गुंतवणूक म्हणून उभी राहण्यास मदत होते. तसेच एसआयपीमुळे बचत करण्याची चांगली आर्थिक सवय लागते.
बचतीसह इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी (Opportunity to invest in equity while saving)
इक्विटीमध्ये गुंतवणूक केल्याने शेअर बाजारातील चढउतारांमधून जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो. ELSS सारख्या फंडमुळे तुमच्या पोर्टफोलिओमधील एकूण भांडवलावर नियंत्रण ठेवण्यासाठी इक्विटी फंड फायदेशीर ठरतात. तसेच या फंडमधून किमान 8 ते 10 टक्के रिटर्न मिळू शकतात, असे तज्ज्ञांचा अंदाज आहे.
डिसक्लेमर : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत गुंतवणूकदाराचा सल्ला घ्या.