Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Tiago EV : भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार; फक्त 21 हजारांत करा बुकिंग!

Tata Tiago EV Bookings

Tata Tiago EV : टाटा मोटर्सने 2 हजार गाड्या आपल्या ईव्ही कस्टमर्ससाठी राखीव ठेवल्या आहेत. कार बनवणारी दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने भारतातील सर्वात स्वस्त टाटा टियागो ईव्ही लॉन्च केली.

Tata Tiago EV Bookings: कार बनवणारी दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही लाँच केली आहे. मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात लाँच होऊन या कारच्या बुकिंग 10 ऑक्टोबर पासून सुरू झाल्या आहेत. तुम्ही नवीन टाटा टियागो ईवी 21,000 रुपयामध्ये बुक करू शकता. टाटा मोटर्सने 2 हजार गाड्या आपल्या EV कस्टमर्ससाठी राखीव ठेवल्या आहेत. सोबतच, टाटा टियागो ईवीच्या पहिल्या 10000 गाड्यांसाठी इंट्रोडक्टरी प्राइस देखील लागू आहे. त्याची कस्टमर टेस्ट ड्राइव डिसेंबरमध्ये होणार आहे. (Tata Tiago EV booking starts from 10th October)

वेगवेगळ्या मॉडेल्सची किंमत!

या कारची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. टाटा टियागो ईव्ही एकूण 7 वैरिएंटमध्ये उपलब्ध आहे, जे की वेगवेगळ्या ट्रिम लेवल साइज, चार्जिंग आणि बॅटरी पॅकमध्ये येते. 
Tata Tiago EV Models Price

बॅटरी आणि चार्जिंग टाईम (Battery and charging time)

टाटा टियागो ईव्ही 19.2 kWh मोटर किंवा 24 kWh यूनिटद्वारे चालवली जाते.  19.2 kWh चा बॅटरी पॅक 60 bhp आणि 110 Nm का टार्क निर्माण करतो. डीसी फास्ट चार्जर ते टाटा टियागो ईव्ही बॅटरी पॅक 57 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांवर जावू शकते. सुमारे 7.2 किलोवॅटचा एसी चार्ज 3 तास 36 मिनिटे बॅटरी पॅकमध्ये  100 टक्के चार्ज करता येतो.


फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स (Features and Safety Features)

फीचर्सच्या बाबतीत म्हटल तर, टाटा टियागो ईवीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी सोबत 7.0-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. ओव्हीआरएम इलेक्ट्रिक एडजस्टशी जोडलेले असते. क्रूज़ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लमेट कंट्रोल, रेन-सेंसिंग वायपर, ऑटो हेडलैम्प्स, लेदर सीट इत्यादि फीचर्स आहे सेफ्टी फीचर्समध्ये हे ड्युएल एअरग, ईडी सोबत एबीएस, ISOFIX चाइल्ड सीट एन्कर, सीटबेल्ट रिमांडर आणि रिवर्स बॅक सेन्सर समाविष्ट आहेत. टाटा टियागो ईवीची भारतीय बाजारपेठेत कोणतीही प्रतिस्पर्धी नाही आणि जवळची प्रतिस्पर्धी टाटा टिगोर ईव्ही आहे जी वेगळ्या सेगमेंटमध्ये आहे.