Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tata Tiago EV : भारतातील सर्वात स्वस्त EV लॉन्च!

TATA Tiago Electric Vehicle Launched

टाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.

TATA Electric Vehicle : टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतातील सर्वात स्वस्त आणि सर्वांना परवडेल अशी इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV) बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) लॉन्च केली. टाटाने या कारची किंमत 8.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीसह बाजारात आणली. टाटाने यापूर्वीही मध्यमवर्गीयांना परवडेल अशी 1 लाखात चार चाकी गाडी आणली होती.

10 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू

टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल्स आणि टाटा पॅसेंजर ईव्ही या युनीटचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेश चंद्र यांनी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत 28 सप्टेंबर 2022 रोजी भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. ही कार पूर्ण क्षमतेने चार्ज केल्यानंतर 300 किमीपर्यंत चालते आणि याच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये ठेवण्यात आली. आतापर्यंत ही भारतातील सर्वात स्वस्त आणि परवडणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. 10 ऑक्टोबरपासून या कारची बुकिंग ओपन होणार असून त्याची डिलिव्हरी जानेवारी, 2023 पासून सुरू होईल.

Tata Tiago EV बॅटरी तपशील

टाटाने त्यांच्या नवीन अपग्रेड केलेल्या Tiago EV या मॉडेलला दोन प्रकारच्या बॅटऱ्यांचा पर्याय दिला आहे. ग्राहक त्यांची गरज आणि बजेटनुसार त्याची निवड करू शकतात. Tata Tiago EV मध्ये सध्या लिथियम-आयन बॅटरीचे 19.2 kWh आणि 24 kWh हे दोन पर्याय दिले आहेत. भविष्यात ग्राहकांची मागणी आणि गरजेनुसार यात बदल करेल, असे कंपनीने म्हटले.

Tiago EV मध्ये चार्जिंग पर्याय

19.2 kWh बॅटरीमध्ये फक्त 3.3 kW AC चार्जरचा पर्याय देण्यात आला आहे. जो फास्ट चार्जिंग करतो. त्यामुळे ही बॅटरी नॉन-डिटेचॅबल देण्यात आली. तसेच 24kWh बॅटरीमध्ये चार्जिंगचे हे 3.3kW आणि 7.2kW Ac दोन पर्याय दिले आहेत. ही बॅटरी सुद्धा नॉन-डिटेचॅबल आहे.

Tata Tiago.ev FEATURES
Image Source: Twitter.com   

टाटा टियागो ईव्ही श्रेणी

जसे की आपल्याला माहित आहे, बॅटरी पॉवरमध्ये बदल केला की रेंजमध्ये सुद्धा बदल होतो. त्यानुसार एकदा चार्ज केलेल्या 19.2kWh क्षमतेच्या बॅटरीची क्षमता 250 किलोमीटरची रेंज आहे आणि 24kWh बॅटरीची क्षमता 315 किमी आहे.

Tata Tiago EV Features

Tata Tiago EV प्रकार आणि त्यांची किंमत

19.2kWh क्षमतेची बॅटरी असलेली इलेक्ट्रिक कार ही दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. त्यातील XE या मॉडेलची किंमत  8.49 लाख तर XT या मॉडेलची किंमत 9.09 लाख असेल. तर 24kWh क्षमतेची बॅटरी असलेली इलेक्ट्रिक कार 5 प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. 3.3kW AC चार्जर अंतर्गत, 3 पर्याय उपलब्ध आहेत. XT या मॉडेलची किंमत 9.99 लाख, XZ+ ची किंमत 10.79 लाख आणि XZ+टेक LUX मॉडेलची किंमत 11.29 लाख असणार आहे. तर 7.2kW AC चार्जर अंतर्गत XZ+ आणि XZ+tech LUX हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यांची किंमत अनुक्रमे 11.29 लाख आणि 11.79 लाख असणार आहे.