टाटा समूहाच्या (Tata Group) खरेदीनंतर देशातील सर्वात जुनी विमान कंपनी एअर इंडियाकडून (Air India) एक मोठा आणि ऐतिहासिक करार केला जात आहे. एअर इंडिया लवकरच आपल्या ताफ्यात 500 नवीन विमानांचा समावेश करणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एअर इंडियाने अब्जावधी डॉलर्सची 500 जेट विमाने एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याची योजना आखली आहे. हा टाटा समूहाचा महत्त्वाकांक्षी करार आहे. टाटा समूह एअर इंडियाला पुनरुज्जीवित करणार आहे, ज्या अंतर्गत ही ऑर्डर देण्यात आली आहे.
Table of contents [Show]
नॅरो बॉडी जेट आणि वाइड बॉडी विमाने खरेदी (Purchase of narrow body jets and wide body aircraft)
या 500 नवीन विमानांपैकी 400 हून अधिक विमाने नॅरो बॉडी जेट असतील आणि जवळपास 100 विमाने वाइड बॉडी असतील. यामध्ये Airbus A350 आणि Boeing 787 आणि 777 चा समावेश आहे. एअरबस आणि बोईंगने अद्याप या करारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. टाटा समूहाने जानेवारीमध्ये केंद्र सरकारकडून एअर इंडियाची पुन्हा खरेदी केली होती आणि सप्टेंबरमध्ये Vihaan.AI संदर्भात सर्वसमावेशक योजना जाहीर केली होती. तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला शाश्वत आणि फायदेशीर वाढीच्या मार्गावर नेण्याचा या योजनेत समावेश आहे.
गुरजोत माल्ही यांना विस्ताराहून एअर इंडियात आणले (Gurjot Malhi brought to Air India from Vistara)
याशिवाय एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांना कळवले होते की, गुरजोत माल्ही यांची विस्तारा येथून कंपनीचे चिफ एथिक्स काऊंन्सलर (CEC) म्हणून निवड करण्यात आली आहे. गुरजोत माल्ही यांनी विस्तारा येथेही अशीच यंत्रणा उभारली होती. माल्ही गेल्या 10 वर्षांपासून टाटा समूहाशी संबंधित आहेत. गुरजोत माल्ही यांनी टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संपादक, बॉम्बे हाऊसमध्ये टाटा सन्सचे सल्लागार आणि विस्तारा सीईओचे सल्लागार म्हणून काम केले आहे. गुरजोत माल्ही यांनी विस्तारा मध्ये एथिक्सचं एक स्ट्रक्चर सेटअप केलं आणि 2014 पासून विस्ताराचे चिफ एथिक्स काऊंन्सलर (CEC) आहेत.
हा करार विशेष का आहे? (Why is this deal special?)
टाटा समूहाची ही योजना यशस्वी झाल्यास विमानांच्या संख्येच्या बाबतीत ती सर्वात मोठी विमान कंपनी बनू शकते. एवढेच नाही तर एअर इंडिया ऑर्डरच्या बाबतीत अमेरिकन एअरलाईन्सलाही मागे टाकू शकते, असेही म्हटले जात आहे. या कंपनीने दशकभरापूर्वी एअरबस आणि बोईंगला 460 जेटची ऑर्डर दिली होती. याशिवाय, एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाच्या घोषणेनंतर टाटा समूहाने ही घोषणा केली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. विस्तारासोबत झालेल्या करारात एअर इंडियाला 218 विमानांचा ताफा मिळाला आहे. देशांतर्गत उड्डाण करणार्या कंपन्यांमध्ये इंडिगोनंतरच तिचा क्रमांक येतो.
काय आहे टाटाची योजना? (What is Tata's plan?)
अलीकडेच टाटा आणि एसआयएने एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे. एअर इंडिया ग्रुपर एअर इंडिया, विस्तारा, एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे विलीनीकरण मार्च 2024 पर्यंत पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. या ग्रुपरला एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशिया इंडियाच्या विलीनीकरणाद्वारे कमी किमतीत उड्डाण सेवा देऊन बाजारपेठ काबीज करायची आहे. आता 500 नवीन विमानांच्या ऑर्डरद्वारे, टाटा समूह अत्यंत सावधगिरीने मोठ्या संख्येने प्रवाश्यांना भारतात येण्या-जाण्यासाठी लक्ष्य करू इच्छित आहे. भारतातून इतर देशांमध्ये जाणाऱ्या वाहतुकीत परदेशी कंपन्यांचा अजूनही मोठा वाटा आहे.