मारुती सुझुकीच्या बलेनोने (Maruti Suzuki Baleno) भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. उत्तम लुक आणि फिचर्स तसेच उत्तम मायलेज यामुळे Nexa डिलरशीपवर या प्रिमीयम हॅचबॅक साठी गर्दी होत आहे. तुम्ही देखील मारुती सुझुकी बलेनोला सुलभ हप्त्यांद्वारे फक्त 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह मारुती बेलोनोचा Zeta मॉडेल खरेदी करु शकता. यानंतर तुम्ही निश्चित व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता. Baleno Zeta मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 8.26 लाख रुपये आहे. मारुती सुझुकी बलेनो लूक आणि फीचर्सच्या बाबतीत उत्तम आहे.
एकूण 9 प्रकार, सीएनजी चा देखील ऑप्शन (Total 9 Variants, CNG Option Also)
मारुती सुझुकी बलेनो 6.49 लाख ते 9.71 लाख रुपयांपर्यंतच्या एक्स-शोरूम किमतींसह सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा या 4 ट्रिम स्तरांवर एकूण 9 प्रकारांमध्ये ऑफर केली जाते. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायासह या कारचे मायलेज 22.35 kmpl ते 30.61 km/kg आहे. मारुती बलेनोमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल, पुश स्टार्ट/स्टॉप बटण, कीलेस एंट्री यासह इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
मारुती सुझुकी बलेनो झेटा एमटी सुलभ कर्ज सेवा (Maruti Suzuki Baleno Zeta MT Easy Loan Service)
मारुती सुझुकी बलेनोची सर्वाधिक विक्री होणाऱ्या बलेनो झेटा मॅन्युअलच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत रु. 8.26 लाख आणि ऑन-रोड किंमत रु. 9,26,974 आहे. आता मारुती बलेनो झेटा मॅन्युअल व्हेरिएंट फायनान्सबद्दल बोलायचे झाले तर, जर तुम्ही 1 लाख रुपये (ऑन-रोड शुल्क आणि इतर आवश्यक खर्च) डाउनपेमेंट देऊन हा प्रीमियम हॅचबॅक कर्ज म्हणून घेतला तर तुम्हाला 8,26,974 रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर व्याज दर 9 टक्के असेल आणि तुम्ही 5 वर्षांसाठी कर्ज घेत असाल, तर तुम्हाला पुढील 60 महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला 17,167 रुपये हप्ता म्हणून भरावे लागतील.