Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Swiggy Layoffs 2023: जागतिक मंदीचा चटका स्विगीलादेखील, 380 कर्मचाऱ्यांना काढले नोकरीवरून

Swiggy Layoffs 2023

Image Source : http://www.itln.in.com/

Swiggy: अॅमेझाॅन, गुगल, शेअरचॅट, टि्विटर यांच्या पाठोपाठ आता कर्मचारी कपातीमध्ये स्विगीचादेखील समावेश झाला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy) जवळजवळ 380 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले असल्याची माहिती मिळाली. आम्हाला आमची टीम लहान करायची असल्याने, आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

Global Recession: जागतिक मंदीच्या संकटात जवळजवळ सर्वच कंपन्या अडकल्या आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक कंपन्या कर्मचारी कपात करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी सर्वच कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे दिसत आहे. आता अॅमेझाॅन (Amazon), गुगल (Google), शेअरचॅट (Sharechat), टि्विटर (Twitter) यांच्या पाठोपाठ स्विगीने (Swiggy) देखील कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

380 कर्मचाऱ्यांना नारळ (380 Employees were Laid Off)

जागतिक मंदीच्या लाटेचा परिणाम आता स्विगीवरदेखील झाला आहे. एकापाठोपाठ कर्मचारी कपात करण्याच्याबाबतीत आता स्विगीचादेखील समावेश झाला आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने सुमारे 380 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. कंपनीच्या सीईओंचा मेल या कर्मचाऱ्यांना गेला असून, या मेलमध्ये कर्मचारी कपात करण्याची असंख्य कारणे सांगण्यात आली आहेत. तसेच आम्ही टीम लहान करण्याचा कठीण निर्णय घेतला असल्याचेदेखील या मेलमध्ये सांगितले आहे.

सीईओ श्रीहर्ष मजेटी प्रतिक्रिया (CEO Sriharsh Majty's Reaction)

स्विगी कंपनीचे सीईओ (CEO) श्रीहर्ष मजेटी (Sriharsha Majety) म्हणतात की, आता फूड क्षेत्रात पुढे जाणे खूप कठीण झाले आहे, याची विकासाची गती मंदावली आहे. त्यामुळे नफादेखील मिळत नाही. त्यामुळे कंपनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कंपनी सुरू राहण्याकरिता अगदी क्षुल्लक भांडवल आमच्याकडे शिल्लक आहे. पुढे अधिक कर्मचाऱ्यांना घेऊन काम करणे सोपे नाही. त्यामुळे हा निराशाजनक निर्णय घेण्यात आला आहे.

ओव्हरहायरिंग जबाबदार (Responsible for Overhiring) 

वाढत्या स्पर्धेमुळे फूड डिलिव्हरी क्षेत्राचा वाढीचा दर हा मंदावला आहे. तसेच कंपनीला नफ्याच्या ध्येयापर्यंत पोहोचणे अवघड झाले आहे. आम्ही इतर अप्रत्यक्ष खर्चातदेखील कपात केली आहे. जसे की पायाभूत सुविधा, कार्यालय/सुविधा इत्यादी. आमचे भविष्यातील नियोजन पाहता, आमच्या एकूण कर्मचार्‍यांच्या कामाला आम्हाला योग्य किंमत देण्याचीही आवश्यकता होती. मात्र याला कारणीभूत “ओव्हरहायरिंग” ठरली असल्याचे कंपनीचे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी स्पष्ट केले आहे.