सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.
Suryoday Small Finance बँकेचा असा असेल नवीन व्याजदर
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने मंगळवारी हे दर वाढवले आहेत. 0.5 टक्के ते 2.26 टक्के इतकी ही वाढ करण्यात आली आहे. तीन वेगवेगळ्या कालावधीसाठी हे व्याजदर आहेत. सुधारित दराप्रमाणे 7 दिवस ते 10 वर्षाच्य कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतीच्या ठेवींसाठी 4 टक्के ते 9 .01 टक्के इतका व्याजदर मिळेल. ज्येष्ठ नगरिकांसाठी 4.50 टक्के ते 9.26 टक्के असा व्याजदर आता मिळणार आहे. Suryoday Small Finance बँकेने 15 दिवसांच्या मर्यादित कालावधीसाठी प्रोत्साहनपर 5 वर्षांच्या ठेवीही गुंतवणूकीस खुल्या केल्या आहेत.
सुरक्षित परताव्यासाठी मुदत ठेवींना (FD) पसंती
गुंतवणूकदारांसामोर गुंतवनणूकीचे विविध पर्याय उपलब्ध असतात. यामध्ये सुरक्षित परताव्याचा (रिटर्न) विचार करणाऱ्या ग्राहकांचेही प्रमाण जास्त असते. अशा ग्राहकांची एफडीला पसंती असते. ठराविक एक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करायची आणि अगोदरच निश्चित झालेला परतावा मिळणे, हा पर्याय बरेच गुंतवणूकदार स्वीकारतात. त्यांच्यासाठी एफडीवरील व्याजदर वाढत आहेत, ही एक चांगली संधी आहे. यापूर्वीही अलीकडच्या काही दिवसात बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत.
स्मॉल फायनान्स बँकांमध्ये अधिक व्याजदर
दीर्घ कालावधीचा विचार केला तर बँकेतील मुदत ठेवीमधील (एफडी) परतावा कमी झाला आहे. लोकांना अपेक्षित असणारा व्याज दर मिळत नाही. मागील काही वर्षात बँकेतील व्याज दर अतिशय कमी झाले आहेत. मात्र स्मॉल फायनान्स बँक तुलनेने एफडीवर अधिक व्याजदर देताना दिसत आहेत. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी मुदत ठेवीवर चांगला परतावा मिळणे महत्वाचे ठरते.