Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BharatPe CEO Step Down: सुहेल समीर यांनी भारत पे चे सीईओ पद सोडणार, नेगी यांची सीइओ म्हणून नियुक्ती

BharatPe CEO Step Down

Image Source : www.newsbytesapp.com

BharatPe CEO Step Down : भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

भारतपेचे सीईओ सुहेल समीर यांनी आपले पद सोडले आहे. कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, समीर गेल्या वर्षी सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांची हकालपट्टी केल्यापासून कंपनीच्या कामकाजावर देखरेख करत आहेत  आणि आता ते पद सोडण्याच्या तयारीत आहेत.

समीर आता प्रमुख स्ट्रॅटेजी ऑफिसरची भूमिका स्वीकारणार असून नेतृत्वाच्या पदांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. BharatPe ने आज जाहीर केले की सुहेल समीर हे 7 जानेवारी 2023 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी न राहता ते आता धोरणात्मक सल्लागार असतील,असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार,  कंपनीचे वर्तमान सीएफओ नलिन नेगी यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत भागीदारी करण्यासाठी अंतरिम सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारतपेने हे देखील स्पष्ट केले की, कंपनीने उत्तराधिकाराच्या नियोजनात मदत करण्यासाठी आणि कंपनीसाठी नवीन सीईओसाठी मदत करण्यासाठी "एक्झिक्युटिव्ह सर्च फर्म" नियुक्त केले आहे.

भारतपे बोर्डाचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, समीरच्या उत्कृष्ट योगदानासाठी आणि कंपनीला विविध आव्हानांवर मात करण्यासाठी मदत केल्याबद्दल ते त्यांचे आभारी आहेत. “आम्ही भारतपेला नवीन उंचीवर नेणारा लीडर शोधण्यासाठी वेळ आणि संसाधने देण्याची गरज जाणतो  आणि सुहेल आणि नलिन यांच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,’’ असे ते म्हणाले. अंतरिम सीईओ म्हणून नलिन नेगी यांच्या पदासाठी  आम्ही उत्सुक आहोत. तसेच, आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहोत. जागतिक दर्जाच्या आर्थिक उत्पादनांच्या श्रेणीसह लाखो एमएसएमईंना सक्षम बनवण्याच्या आमच्या मिशनमध्ये आम्ही पुढे जात आहोत,’’ असेही ते म्हणाले.

नेगी ऑगस्ट 2022 मध्ये BharatPe मध्ये सामील झाले. याआधी, ते जवळपास 10 वर्षे SBI कार्ड्सचे मुख्य वित्तीय अधिकारी होते.