• 31 Mar, 2023 09:41

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock Market Closing: सेन्सेक्समध्ये 500, निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण

Stock Market Closing

Image Source : www.wikipedia.com

Stock Market Closing: गेले अनेक दिवस शेअर बाजारात घसरण बघायला मिळत होती. आज गुरुवारी देखील हे चित्र कायम राहिले. गुरुवारी सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची घसरण झाली आहे.

गुरुवारी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 500 तर निफ्टीमध्ये 129 अंकांची  घसरण झाली आहे.आज 2 मार्च रोजी  सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांमध्ये तोटा झाला आहे. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी 30 शेअर्सचा प्रमुख बेंचमार्क निर्देशांक BSE सेन्सेक्स 501.73 अंकांच्या घसरणीसह 58,909.35 वर बंद झाला. 0.84 टक्के इतकी यात घट झाली आहे. तसेच, नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSE चा निफ्टी 129.00 अंकांच्या म्हणजेच 0.74% च्या घसरणीसह 17,321.90 वर बंद झाला आहे.

क्षेत्रीय आधारावर आज रिअॅल्टी, पॉवर तसेच तेल आणि वायू निर्देशांकात वाढ नोंदवली गेली.याशिवाय इतर सर्व निर्देशांकांवर विक्रीचा दबदबा राहिला. आज रिअल्टी निर्देशांकात 2 टक्क्यांची वाढ दिसून आली. दुसरीकडे, आयटी, ऑटो आणि बँक निर्देशांक 0.8-1 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक आज थोड्या घसरणीसह बंद झाले. मागील 8 दिवसात शेअर मार्केटमध्ये सुरु असलेल्या घसरणीला बुधवार 1 मार्च रोजी लगाम लागला होता.  मेटल, टेक, बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ऑटो, गॅस-तेल आणि निवडक एफएमसीजी शेअर्समुळे मार्केटला सपोर्ट मिळालेला बघायला मिळाला.  काल सेन्सेक्स 449 अंकांनी वाढून 59411 पातळीवर बंद झाला तर दुसरीकडे निफ्टीही 147 अंकांच्या उसळीसह 17451 पातळीवर बंद झाला होता. मागील काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये घसरण पहायला मिळत असताना या पार्श्वभूमीवर आज काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये सकाळपासून घसरण दिसून येत आहे. आजच्या व्यवहाराला शेअर मार्केटने घसरणीसह सुरुवात केली होती.  सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकात घसरण पहायला मिळत होती.  निफ्टी 17450 च्या खाली आला होता तर  आयटी शेअर्सच्या विक्रीमुळे शेअर मार्केटवर दबाव वाढला आहे. मेटल आणि ऑटो शेअर्सही घसरत असताना निफ्टी बँक हिरव्या चिन्हात ट्रेड करताना दिसत आहे. सकाळी सुरुवातीच्या ट्रेडमध्ये  सेन्सेक्समध्ये 18 अंकांची घसरण असून तो 59,393.04 च्या पातळीवर होता  तर निफ्टी 16 अंकांच्या घसरणीनंतर 17,434.70 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसत होता. सेन्सेक्स 30 चे 23 शेअर्स लाल चिन्हात ट्रेड करत होते. सकाळच्या वेळेत  आजच्या टॉप गेनर्समध्ये बजाज (BAJAJFINSV), एलटी (LT), टाटा स्टील (TATASTEEL), टायटन (TITAN), एचडीएफसी बँक (HDFCBANK) यांचा समावेश आहे. तर टॉप लूजर्समध्ये एम अँड एम (M&M), इन्फोसिस (Infosys), टीसीएस (TCS), टेक महिंद्रा (Tech Mahindra), एक्सिस बँक (Axis Bank), मारुती (Maruti), एसबीआय (SBI), विप्रो (Wipro) यांचा समावेश असलेला बघायला मिळाला होता.

बुधवारी एक दिवस शेअर बाजारात वाढ बघायला मिळाली. मात्र यात सलगता राहू शकलेली नाही. गुरुवारी शेअर बाजारात पुन्हा घसरण बघायला मिळाली आहे. बुधवारच्या आधी सलग 8 दिवस देशांतर्गत बाजारात घसरण दिसून येत होती.