Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीपने एकत्रित क्रेडीट कार्ड केले लाँच, काय आहेत त्याचे फायदे?

EaseMyTrip & Standard Chartered launched Credit Card

Image Source : www.cardinsider.com

Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड आणि इज माय ट्रीप यांनी एक क्रेडिट कार्ड लाँच केले आहे. खास प्रवासासाठी उपयुक्त अशा या क्रेडिट कार्डमुळे वर्षभर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सवलती मिळणार आहेत. नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आहेत, त्याबाबत पुढे वाचा.

EaseMyTrip & Standard Chartered launched Credit Card: स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने नुकतेच भारतातील दुसरे सर्वात मोठे ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्म, इज माय ट्रीपच्या (EaseMyTrip) सहकार्याने को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले. इज माय ट्रीप (EaseMyTrip) स्टँडर्ड चार्टर्ड क्रेडिट कार्ड अंतर्गत, ग्राहकांना त्वरित सवलत आणि रिवॉर्ड पॉइंट्ससह विशेष प्रवासी लाभ मिळतात. या वैशिष्ट्यांमुळे, सध्या या क्रेडिट कार्डची चर्चा सुरू आहे. अनेक बँका त्यांच्या क्रेडिट कार्डवर प्रवास, खरेदी यांवर सवलती देतात, काही ऑफर्स देतात. मात्र स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने थेटे खास प्रवासासाठी क्रेडिट कार्ड आणले आहे.

हे आहेत, ट्रॅव्हल क्रेडिट कार्डचे फायदे (Benefits of a travel credit card)

स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या ट्रॅव्हल क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल बुकिंगवर 20 टक्के  सूट मिळणार आहे. दुसरीकडे, इज माय ट्रिपच्या (EaseMyTrip) वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंगवर फ्लॅट 10 टक्के सूट उपलब्ध केली जाणार आहे. कार्डधारकांना फ्लाइट, स्टँडअलोन एअरलाइन्स आणि हॉटेलच्या वेबसाइट्स किंवा अॅप्सवर केलेल्या हॉटेल बुकिंगवरही त्वरित रिवॉर्ड पॉइंट मिळतील. इज माय ट्रीपसह (EaseMyTrip) अनेक ब्रँड्समधून मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या रिवॉर्ड कॅटलॉगवर रिडीम केले जाऊ शकतात.

या क्रेडिट कार्डचा एक मोठा फायदा म्हणजे ग्राहकांना इज माय ट्रीप वेबसाइट किंवा मोबाइल अॅप्लिकेशनवर वर्षभर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंगवर सूट मिळेल. तसेच, कार्डधारकांना प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत 1 देशांतर्गत लाउंज प्रवेश आणि दरवर्षी दोनआंतरराष्ट्रीय लाउंज प्रवेश मिळेल. याव्यतिरिक्त, इज माय ट्रिपच्या वेबसाइट/मोबाइल ऍप्लिकेशनवर प्रचारात्मक ऑफर आणि सवलतींचा लाभ घेऊ शकतात.

या करारावर भाष्य करताना, इज माय ट्रीपचे सह-संस्थापक रिकांत पिट्टी म्हणाले, आमचे लक्ष एक प्रवासी परिसंस्था तयार करण्यावर आहे. जिथे ग्राहकांना नेहमीच फायदा होईल. जेव्हा आम्ही हे करतो, तेव्हा आमचे लक्ष आमच्या ग्राहकांचे हितसंबंध असलेल्यांशी भागीदारी शोधण्यावर असते. त्याच वेळी, ग्राहकांना मल्टी प्रमोशनल ऑफरकडे आकर्षित केले जाऊ शकते. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी स्टँडर्ड चार्टर्ड बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की हे क्रेडिट कार्ड ग्राहकांचे पसंतीचे कार्ड ठरेल.

  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल बुकिंगवर 20 टक्के सूट - ही सवलत कोणत्याही किमान बुकिंग रकमेशिवाय इज माय ट्रिपसह, 5 हजार ते  10 हजार रुपयांपर्यंत मिळेल.
  • देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट बुकिंगवर 10 टक्के सवलत - ही सवलत कोणत्याही किमान बुकिंग रकमेशिवाय इज माय ट्रिपसह 1 हजार ते 5 हजारांपर्यंत मिळेल.
  • इज माय ट्रिपसहवर देशांतर्गत बस बुकिंगवर फ्लॅट 125 रुपयांची सूट मिळेल, किमान बुकिंग रक्कम 500 रुपये सूट मिळेल.
  • इज माय ट्रिप व्यतिरीक्त निवडक व्यापारी श्रेणींमध्ये (स्टँडअलोन हॉटेल आणि एअरलाइन वेबसाइट्स/अॅप्स आणि आउटलेट) खर्च केलेल्या प्रत्येक 100 साठी 10 रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत.
  • व्हिसा कार्ड स्वीकारल्या जाणार्‍या देशांमध्ये इतर व्यापारी श्रेणींमध्ये खर्च केलेल्या प्रत्येक 100 रुपयांसाठी 2 रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत.
  • प्रति कॅलेंडर तिमाहीत 1 मानार्थ घरगुती लाउंज प्रवेश आणि प्रति वर्ष 2 विनामूल्य आंतरराष्ट्रीय लाउंज प्रवेश मिळणार आहे.