Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Credit Card: जाणून घ्या, LIC Credit Card चे विविध फायदे आणि वैशिष्टे..

LIC Credit Card

Image Source : http://www.liccards.in/

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स मिळतात.

LIC Credit Card: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा प्रदान करते. कंपनी विविध प्रकारचे क्रेडिट कार्ड ऑफर करते आणि त्यावर तुम्हाला अनेक आकर्षक ऑफर्स, रिवॉर्ड पॉइंट्स आणि लाइफस्टाईल, प्रवास, जेवण, खरेदी, मनोरंजन यासंबंधित इतर अनेक ऑफर्स  मिळतात. LIC क्रेडिट कार्ड घेतल्यास, तुम्हाला मोफत विमा, रिवॉर्ड्स प्रोग्राम, अॅड-ऑन कार्ड, मास्टरकार्ड आणि व्हिसा कार्ड फायदे यापासून अनेक फायदे सुद्धा मिळू शकतात. तर जाणून घेऊया कोणकोणते क्रेडिट्स कार्ड मिळतात आणि त्याचे फायदे काय? 

कोणकोणते क्रेडिट कार्ड मिळू शकतात? (What credit cards are available?)

  • एलआयसी टायटॅनियम क्रेडिट कार्ड
  • एलआयसी प्लॅटिनम क्रेडिट कार्ड
  • LIC Signature क्रेडिट कार्ड
  • एलआयसी गोल्ड ईएमव्ही क्रेडिट कार्ड
  • एलआयसी प्लॅटिनम ईएमव्ही क्रेडिट कार्ड

LIC क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये काय आहेत? (What are the features of LIC Credit Card?)

विमा (Insurance)

तुम्ही एलआयसीचे Signature  क्रेडिट कार्ड घेतल्यास, तुम्हाला त्यासोबत हरवलेला कार्ड liability विमा मिळेल. कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास, कोणताही फसवा व्यवहार झाल्यास, कार्डधारकाला त्याच्या क्रेडिट मर्यादेपर्यंत विमा मिळतो. मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.

शिल्लक हस्तांतरण (Balance Transfer)

हे देखील एक उत्तम वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याद्वारे, ग्राहक इतर कोणत्याही बँकेच्या क्रेडिट कार्डमधून थकबाकीची रक्कम एलआयसीच्या क्रेडिट कार्डमध्ये हस्तांतरित करू शकतात. तुम्हाला बॅलन्स ट्रान्सफरसाठी व्याजदरावर चांगल्या ऑफर देखील मिळतात.

Fuel surcharge waived

LIC क्रेडिट कार्डसह, तुम्हाला देशभरातील पेट्रोल पंपांवर  400 ते 4,000 मधील व्यवहारांसाठी इंधन अधिभारावर 1% पर्यंत सूट मिळते.

Easy EMI conversion

जर तुम्ही 2,500 रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली तर तुम्ही ती मासिक हप्त्यात रूपांतरित करू शकता आणि परतफेड देखील कमी व्याज दराने केली जाईल.

Add-on card

प्राथमिक कार्डधारक त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी त्याच्या कार्डवर एक ते तीन अॅड ऑन कार्ड घेऊ शकतो.

अर्ज कसा करावा? (How to apply?)

  • एलआयसी ऑफिसला भेट द्या. 
  • तुम्ही एलआयसीच्या कार्यालयात जाऊनही या कार्डांसाठी अर्ज करू शकता. 
  • तुम्हाला तेथे अर्ज भरावा लागेल आणि आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
  • तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता
  • तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही अर्ज करू शकता. 
  • ऑनलाइन अर्जामध्ये तुम्हाला नाव, ईमेल आयडी, पत्ता यांसारखे डिटेल्स अॅड करावे लागतील आणि सबमिट करावे लागतील.