Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

STAGE OTT Platform, देशभरातील स्थानिक बोली भाषांसाठी भारतातला पहिला OTT प्लॅटफॉर्म!

Shark Tank

सध्या हरियाणा आणि राजस्थानमधील 2,000 हून अधिक स्थानिक कलाकार आणि निर्मात्यांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये मनोरंजनपर कार्यक्रम निर्मितीसाठी आणि मार्केट मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.

एकाच रात्रीत 40 कोटी रुपयांची उलाढाल असलेली  कंपनी गमावल्यानंतर, विनय सिंघल (Vinay Singhal) हे त्यांच्या मूळ गावी, हरयाणाला पोहोचले. कुठला नवीन व्यवसाय सुरु करावा याचा ते विचार करत होते. त्यांचे मित्र  शशांक वैष्णव (Shashank Vaishnav) आणि प्रवीण सिंघल (Pravin Singhal) यांच्यासोबत सुरू केलेली व्हायरल कंटेंट कंपनी ‘विटीफीड’ (WittyFeed) अचानक काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. या तिन्ही मित्रांना आता नवा व्यवसाय सुरु करायचा होता. 

व्यावसायिक अपयशामुळे गावी आलेल्या या मित्रांना हे जाणवले कि त्यांच्याच आसपास अशी कितीतरी कलाकार मंडळी आहेत ज्यांना त्यांच्या गावातले लोक सोडून कुणी ओळखत नाही. अशा कलाकारांना नेटफ्लिक्सच्या तोडीचे  OTT प्लॅटफॉर्म मिळवून देता येईल का यावर त्यांनी विचार सुरु केला. भारतात आजघडीला 40 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्म आहेत.  हिंदी, तमिळ, तेलुगू सारख्या स्थानिक भाषेत मनोरंजनपर कार्यक्रम त्यांच्याद्वारे दिले जातात.  विनय, शशांक आणि प्रवीण यांना आढळले की स्थानिक बोली भाषांमधून कोणतेही सिनेमा किंवा वेब सीरिज नावाजलेल्या OTT प्लॅटफॉर्मवर नाहीयेत. 

एक मोठा लोकसमूह जी भाषा बोलतो, ती OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नव्हती. राजस्थानमध्ये सुमारे 70 दशलक्ष लोक राजस्थानी, मारवाडी भाषा बोलतात. त्याचप्रमाणे बिहारमध्ये लोक भोजपुरी, मैथली, ब्रज भाषा बोलतात. उत्तर प्रदेशमध्ये अवधी, ब्रज, भोजपुरी, बुंदेलीसह अनेक भाषांचा वापर केला जातो. 
घरात हरयाणवी भाषा बोलणाऱ्या या तिघानाही हे लक्षात आले की, आपण बोलत असलेल्या भाषेत देखील OTT प्लॅटफॉर्मवर सिनेमा, वेबसिरीज उपलब्ध नाही. प्रत्येक मैलावर भाषा बदलत जाणाऱ्या देशात आपण वेगळा प्रयोग करू शकतो हे त्यांना जाणवलं. नेमकी इथेच त्यांना एक नवी योजना सुचली आणि बोली भाषेतले कार्यक्रम देणारे OTT प्लॅटफॉर्म STAGE जन्माला आले! 


काय आहे STAGE?

2019 मध्ये सुरू झालेले, STAGE हे स्थानिक बोलीभाषांसाठी पहिले OTT प्लॅटफॉर्म आहे. ‘गोलू मोलू री शायरी’,  ‘खोटे सिक्के’ , ‘चोरियां बोझ ना होती’ , आणि ‘गँग्स ऑफ हांसीपूर’ अशा वेब सिरीज, चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, स्टँडअप कॉमेडि शो, कविता, लोककला आदी विषयांवर जवळपास 400 तासांपेक्षा अधिक चालेल इतका कंटेट STAGE वर उपलब्ध आहे. 


स्थानिक बोलीभाषांसाठी एक स्टेज

सध्या STAGE  हरियाणवी आणि राजस्थानी बोलीभाषांवर लक्ष केंद्रित करत आहे. राजस्थानमध्ये जून 2022 मध्ये सुरू झालेल्या या प्लॅटफॉर्मला लोकांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे. 4 जानेवारी रोजी, OTT प्लॅटफॉर्मने राज्यात पहिली मोठी वेब सिरीज, ‘सरपंच’ लाँच केली.ही  वेब सिरीज गावातील राजकीय नाटकावर केंद्रित आहे, दर्शकांनी या वेब सिरीजला पसंती दर्शवली आहे.

प्ले स्टोअरवर या एप्लिकेशनला 1 दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स आहेत. हरियाणामध्ये 2.25 लाख सदस्य आणि राजस्थानमध्ये 10,000 सदस्यांसह हे सर्वात मोठे प्रादेशिक OTT प्लॅटफॉर्म बनले आहे. STAGE चे हरियाणा आणि राजस्थानमध्ये 2.25 लाखाहून अधिक सशुल्क सदस्य आहेत, जे दर महिन्याला 30 टक्क्यांनी वाढत आहेत. येणाऱ्या काळात भोजपुरी, मागधी, मैथिली या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रम निर्मितीचा प्रयत्न त्यांच्याद्वारे केला जाणार आहे. त्यांनतर बुंदेली, अवधी, छत्तीसगढ़ी, नेपाळी, कोंकणी, सिंधी, आसामी, ओडियामध्ये देखील STAGE उपलब्ध करून देण्याचा त्यांचा विचार आहे. 


शार्क टँकमध्ये झळकणार STAGE

STAGE चे सह-संस्थापक विनय सिंघल, प्रवीण सिंघल आणि शशांक वैष्णव त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मसाठी निधी उभारण्यासाठी शार्क टँकच्या सीझन 2 वर दिसणार आहेत. अगोदरच्या व्यवसायातून अपयश आले तरी नवा व्यवसाय मोठ्या ताकदीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 


स्थानिक पातळीवर बॉलिवूड तयार करण्याची इच्छा! 

देशभरात कार्यरत 40 लोकांच्या टीमसह, STAGE चे मुख्यालय नोएडा येथे आहे आणि 100% दूरस्थपणे (Remote Work) ही कंपनी काम करते. शिवाय, ते हरियाणात 1,500 हून अधिक आणि राजस्थानमध्ये 500 हून अधिक स्थानिक कलाकार आणि निर्माते आणि काम करत असल्याचे विनय सांगतात. सगळ्याच कलाकारांना मुंबईला जाणे शक्य नसते, परंतु आमच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कलाकारांना आणि निर्मात्यांना रोजगार मिळतो आहे असे STAGE चे संस्थापक सांगतात.

STAGE ची प्रेरणादायी कथा तुम्हांला लवकरच शार्क टँकच्या येणाऱ्या काही भागांत पाहायला मिळणार आहे. स्टार्टअप संदर्भात अशाच स्टोरीज वाचण्यासाठी MahaMoney ला फॉलो करा.