Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank S3: ‘या’ महिलेने अवघ्या 50 हजार रुपयात उभारला 12 कोटींचा व्यवसाय, पाहा डिटेल्स

Shark Tank

Image Source : https://www.freepik.com/

शार्क टँक इंडियाचा तिसऱ्या सीझनमध्ये The Cinnemon Kitchen च्या संस्थापक प्रियाशा सलूजा या सहभागी झाल्या होत्या. त्यांनी अवघ्या 50 हजार रुपये गुंतवणूक करत 12 कोटी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे.

शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन सुरु झाला आहे. रिॲलिटी शोला पहिल्या सीझनपासूनच यातील परिक्षक व सहभागी होणाऱ्या उद्योजकांमुळे मोठी पसंती मिळत आहे. तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी झालेल्या अशाच एका महिला उद्योजकाची कल्पना परिक्षकांना प्रचंड आवडली व त्यांनी यात गुंतवणुकीची तयारीही दर्शवली.

नवीन सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये The Cinnemon Kitchen च्या संस्थापक प्रियाशा सलूजा या सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या या व्यवसायात एका शार्क्सने गुंतवणूक देखील केली. अवघ्या 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू करण्यात आलेल्या या व्यवसायाची वॅल्यू आज 12 कोटी रुपये आहे.

कोण आहेत प्रियाशा सलूजा?

प्रियाशा सलूजा या  The Cinnemon Kitchen या बेकरीच्या संस्थापक आहेत. प्रियाशा यांचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून झाले आहे. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली. त्यांनी  Asian Paints, PwC आणि Zodiac Clothing Co. Ltd या कंपन्यामध्ये मार्केटिंगच्या पदावर काम केले. 

तसेच,  Dentsu Aegis Network सह जाहिरात क्षेत्रातील कंपन्यांमध्ये देखील विविध पदांवर काम केले. पुढे 2019 मध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातूनच  The Cinnemon Kitchen या बेकरीची सुरुवात झाली.

The Cinnemon Kitchen

प्रियाशा यांनी 2019 मध्ये अवघ्या 50 हजार रुपयांच्या गुंतवणुकीसह घरातूनच  The Cinnemon Kitchen ची सुरुवात केली.  The Cinnemon Kitchen चा व्यवसाय दोन भागात विभागलेला आहे. यातील एक पॅकेजिंग केलेले पदार्थ व दुसरे मेक टू ऑर्डर बेकरी.  The Cinnemon Kitchen द्वारे पौष्टिक केक, बिस्किटसह इतर पदार्थ बनवले जातात. तसेच, 100 टक्के ग्लूटेन-फ्री, वनस्पती आधारित पदार्थ बनवणारी ही पहिलीच बेकरी आहे. दरमहिन्याला सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत शेकडो ग्राहक येथून पदार्थ ऑर्डर करतात. विशेष म्हणजे एकेकाळी घरातून सुरू झालेल्या या व्यवसायाचे काम आता मोठ्या फॅक्ट्रीतून चालते. 

शार्क्सने केली 60 लाखांची गुंतवणूक

कमाईच्याबाबतीत  The Cinnemon Kitchen ला सुरुवातीपासूनच यश मिळत आहे. पहिल्या वर्षीचे 1.40 लाख रुपये उत्पन्न, दुसऱ्या वर्षी 12.50 लाख रुपयांपर्यंत पोहचले होते. तर पुढील वर्षी विक्रीचा आकडा 6 कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. 

हटके पदार्थ व आधीपासूनच असलेल्या लोकप्रियतेमुळे शार्क्सने देखील The Cinnemon Kitchen मध्ये गुंतवणूक करण्यास रस दाखवला. अखेर अमन गुप्ता यांनी प्रियाशा यांच्या व्यवसायात 5 टक्के इक्विटीसह 60 लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. तर व्यवसायाचे वॅल्यूएशन 12 कोटी रुपये ठरवण्यात आले.