Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: Happilo चे सह-संस्थापक Vikas Nahar यांचा करोडपती होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? जाणून घ्या

Shark Tank India Guest Judge Vikas Nahar

Who is Vikas Nahar: FMCG मार्केटमधील नामांकित ब्रँड Happilo चे सह- संस्थापक आणि सीईओ विकास नाहर (Founder & CEO Vikas Nahar) लवकरच शार्क टँक इंडिया 2 च्या SonyLiv वरील डिजिटल एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहेत. फक्त 10,000 रुपयांपासून सुरु झालेला Happilo, 500 करोड रुपयांपर्यंत कसा पोहचला, जाणून घ्या.

सोनी टीव्हीवर (Sony Television) प्रसारित केला जाणारा लोकप्रिय रियालिटी शो शार्क टँक इंडिया सीजन 2 ला लोकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. या शोमध्ये अनेक नवउद्योजक आपली आयडिया शार्क पुढे मांडून गुंतवणूक मिळवतात. शार्क टँक इंडिया सीजन 2 च्या पर्वात जज म्हणून अमन गुप्ता, विनिता सिंह, नमिता थापर, पियुष बन्सल, अमित जैन आणि अनुपम मित्तल पाहायला मिळत आहे. पण लवकरच या कार्यक्रमात गेस्ट शार्क (Guest Judge) म्हणून उद्योगपती विकास डी नाहर (Vikas D Nahar) हजेरी लावणार आहेत.

यासंदर्भातील एक व्हिडीओ सोनी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. शार्क टँक इंडिया 2 सध्या सोनी वाहिनीवर (Sony Television) प्रसारित केले जात आहे, याशिवाय SonyLiv वर त्याचे स्ट्रीमिंग केले जाते. SonyLiv वरील गेटवे टू शार्क टँक इंडिया 2 च्या डिजिटल एपिसोडमध्ये विकास नाहर गेस्ट शार्क म्हणून पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. या निमित्ताने त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊयात.

कोण आहेत विकास डी नाहर?

विकास डी नाहर हॅपिलो (Happilo) उद्योग समूहाचे सह- संस्थापक आणि सीईओ आहेत. जे ड्रायफ्रूट आणि नट्स व्यवसायातील आघाडीचे व्यावसायिक आहेत. ग्राहकांना आरोग्यदायी स्नॅकिंगचे (Healthy Snacks) पर्याय उपलब्ध करून देण्यात हॅपिलोचा मोठा वाटा आहे.

एका शेतकऱ्याच्या कुटुंबातला विकास नाहर यांचा जन्म. त्यांच्या कुटुंबात एकूण 6 लोकं. या 6 लोकांचं पालनपोषण करण्यासाठी त्यांचे वडील सुरुवातीच्या काळात शेती करायचे. त्यांनतर त्यांच्या वडिलांनी आणि त्यांच्या मोठ्या भावाने मिरपूड आणि कॉफी नैसर्गिक रित्या पिकवायला आणि विक्री करायला सुरुवात केली. येथूनच त्यांच्यात उद्योजक बनण्याचे बीज पेरलं गेलं.

जाणून घ्या त्यांचं शिक्षण

2005 साली बंगळूर विद्यापीठातून (Bangalore University) त्यांनी कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमध्ये (Computer Application) पदवी संपादन केली आणि जैन ग्रुपमध्ये स्वतःच्या करिअरची सुरूवात केली. 3 वर्ष जैन ग्रुपमध्ये (Jain Group) वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं. आशियाई ग्राहक वर्गाचा अभ्यास आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठ समजून घ्यायला त्यांनी इथूनच सुरुवात केली.

2008 साली त्यांनी पुढील शिक्षणासाठी जैन ग्रुपमधील नोकरी सोडली आणि थेट पुणे गाठलं. सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमधून (Symbiosis International University, Pune)  त्यांनी 2 वर्षाचा MBA कोर्स पूर्ण केला.

सात्विक ग्रुपची निर्मिती

Satvikk Group
Satvikk.com

या दरम्यान उद्योजक होण्याचं स्वप्न आणखी मोठं झालं आणि त्यातूनच 2010 साली सात्विक ग्रुपची (Satvik Group) निर्मिती झाली. ज्यामध्ये विकास मॅनेजिंग डायरेक्टर झाले. लोकांच्या आरोग्याचा विचार करून चांगली उत्पादनं बाजारात आणण्याचं निश्चित झालं आणि डिसेंबर 2011 मध्ये सात्विकची पहिली शाखा बंगळूरमध्ये सुरु झाली.

पैसे कमवण्यासाठी उत्पादनात तडजोड करायची नाही, असं ठाम मनाशी बाळगून विकास यांनी उत्तम गुणवत्तेची उत्पादनं मार्केटमध्ये सादर केली. सात्विक अंतर्गत उत्कृष्ट दर्जाचे मसाले, चॉकलेट्स, सेंद्रिय पदार्थ, साखर-मुक्त पदार्थ, ड्राय फ्रूट्स, आरोग्यदायी पेय, कुकीज, ज्यूस आणि स्नॅक्समधील अनेक प्रकार ग्राहकांना द्यायला सुरुवात केली.

मूठभरापासून सुरु केलेला व्यवसाय सुमारे 40 प्रकारचे ड्राय फ्रूट्स, 100 प्रकारचे चॉकलेट्स आणि 60 प्रकारच्या मसाल्यांपर्यंत पोहचवला, जेणेकरून ग्राहकांना वेगवेगळे पर्याय निवडण्यासाठी मदत होईल. एका स्टोअरपासून सुरु झालेला व्यवसाय एका वर्षात 13 स्टोअर्सपर्यंत पोहचला. मात्र त्यानंतर व्यवसायावर काळे ढग पसरले आणि 2015 साली विकास यांना सात्विक सोडावं लागलं.

असा झाला Happilo चा जन्म

अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं मानून जोमाने कामाला सुरुवात केली. त्यांच्या या पडत्या काळात त्यांना कुटुंबाने उभं राहायला मदत केली. 2016 साली त्यांना कन्या रत्न प्राप्त झालं आणि त्याच वेळी Happilo उदयाला आलं. केवळ 10,000 रुपये भांडवल आणि दोन विश्वासू सदस्य यांच्या मदतीने हॅपिलोचा प्रवास सुरु झाला.

Happilo - Vikas Nahar
happilo.com

हॅपिलोच्या उत्पादनांच्या चवीने ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'ट्रायल मिक्स' या पहिल्या उत्पादनाला लोकांची पसंती मिळाली आणि हॅपिलोने यशाच्या मार्गावर प्रवास करायला सुरुवात केली. सर्वोत्तम गुणवत्ता असलेले नट्स, ड्रायफ्रूट्स, सीड्स, ड्राय रोस्टेड स्नॅक्स, ट्रायल मिक्स, वेगवेगळ्या सणांसाठी गिफ्ट हॅम्पर अशा अनेक लोकांच्या  गरजेच्या उत्पादनांना प्राधान्य देतं, हॅपिलो मोठं झालं. काही कालावधीनंतर बंगळूरमधील यशवंतपूर (Yeshwantpur) येथे स्वतःचं नवीन युनिट सुरु करण्यात विकास यांना यश मिळालं.

लोकप्रिय FMCG ब्रँड Happilo

Hapillo founder Vikas Nahar
happilo.com

विशेष म्हणजे ई-कॉमर्स साईट्सवर शोधल्या गेलेल्या सर्वात लोकप्रिय FMCG ब्रँडपैकी एक म्हणून आज हॅपिलोला ओळखलं जातं. याशिवाय आज हॅपिलोचे ब्रॅण्ड अँबॅसिटर (Brand Ambassador) म्हणून सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनाही ओळखलं जातं. सामान्य व्यक्ती ते रॉयल कारभार असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवासा वाटणारा हॅपिलो 10,000 रुपयांपासून सुरु झाला खरा, पण त्याचा आत्ताचा टर्न ओव्हर 500 करोड पर्यंत पोहचला आहे.

मला या जगाचा मेवावाला बनायचंय!

"मी नेहमी माझ्या हृदयाचं ऐकतो आणि तेच करतो," असं म्हणतं विकास नाहर यांनी कोट्यवधींचा व्यवसाय फार कमी काळात उभा केला आणि यशस्वीही केला. म्हणूनच तर 2021 मध्ये त्यांना टाईम्स 40 अंडर 40 हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी म्हटलं की, "प्रत्येक शहराचा एक मेवावाला असतो, परंतु मला या जगाचा मेवावाला बनायचं आहे".