शार्क टँक इंडिया सीजन 2: हा बिझनेससंबंधी रियालिटी शो ‘शार्क टँक इंडिया’ (Shark Tank India) चा पहिला सीझन सुपरहिट झाला होता. आता प्रेक्षक या शो च्या दुसऱ्या सीजनची प्रतिक्षा मोठया उत्साहाने करत आहे. सोनी वाहिनीने यापूर्वीच या शो चे अनेक प्रोमोज व टीजर ही सोशल मिडीयावर शेयर केले आहे. जाणून घ्या, या शो ची प्रत्येक अपडेट ‘महाMoney’ सोबत.
Shark Tank India 2 शो कुठे व किती वाजता
आजपासून शार्क टॅंक इंडिया 2 हा शो सोनी चॅनेलवर प्रसारित होणार आहे. जवळजवळ साधारण एक वर्षांनंतर हा शो पुन्हा येत आहे. या लोकप्रिय शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतिक्षा संपली. हा शो तुम्हाला आज, रात्री 10 वाजल्यापासून पाहता येणार आहे. तसेच सोनी चॅनेलचे अँप सोनी लिववर देखील हा शो पाहता येणार आहे. मेकर्स ने शार्क टँक इंडिया शो च्या या नवीन सीजनचे पोस्ट शेअर करत लिहिले, आता इंडियाला बिझनेसची किंमत (Value) कळेल.
कोण असणार परिक्षक (Judges)
शार्क टॅंक इंडिया 2 या शो मध्ये 'बोट' कंपनीचे-फाउंडर अमन गुप्ता (Aman Gupta), लेंसकार्टचे-फाउंडर पीयूष बंसल (Peyush Bansal), शुगर कॉसमेटिक्स ची को-फाउंडर विनीता सिंह, एमक्योर फार्मास्युटिकल्सची सीओ नमिता थापर, शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल आणि कारदेखोचे फाउंडर अमित जैन जज म्हणून असणार आहे. अशनीर ग्रोवरला अमित जैन (Amit Jain) यांनी रिप्लेस केले आहे. शार्क टँक इंडिया सीजन 1 च्या अफाट यशानंतर मेकर्सने शो सीजन 2 करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मार्केटमध्ये बिझनेसमॅन म्हणून उतरणाऱ्या तरूणांसाठी हा शो नक्कीच प्रेरणादायक ठरेल.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            