Shark Tank India: शार्क टॅंक इंडिया 2 या कार्यक्रमाचे प्रेक्षक मोठया आतुरतेने वाट पहात होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली व सीजन दुसरा अखेर सुरू झाला. या शो च्या पहिल्या सीजनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांचा हा लोकप्रिय शो सोनी वाहिनीवर, रात्री दहा वाजता दाखविण्यात येतो. पहिल्या सीजनपेक्षा, दुसऱ्या सीझनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे, हे बदल थोडक्यात जाणून घेऊयात.
सीझन 2 मध्ये 50 एपिसोड
शार्क टॅंक इंडिया 2 (Shark Tank India 2) च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा या शो चे एपिसोड वाढविण्यात आले आहे. पहिल्या सीजनमध्ये 35 एपिसोड दाखविण्यात आले होते, आता सीझन 2 मध्ये 50 एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'शार्क' म्हणजेच परीक्षकांनी पहिल्या सीजनमध्ये 67 बिझनेसमध्ये 42 कोटींची गुंतवणूक केली होती. यंदाच्या दुसऱ्या सीजनमध्ये परिक्षक गुंतवणूक वाढविणार असल्याचे समजत आहे.
परिक्षकांच्या संख्येत बदल
'शार्क टँक इंडिया'च्या पहिल्या सीजनमध्ये 7 परीक्षक होते. तर या सीजनमध्ये 6 परीक्षक असणार आहेत. यामध्ये अमित जैन (Amit Jain), सह-संस्थापक - कारदेखो, पियुष बन्सल, सीईओ - लेन्सकार्ट, अनुपम मित्तल (Anupam Mithal) - शादी डॉट कॉम, अमन गुप्ता, सह-संस्थापक - बोट (Bot), विनिता सिंग, सीईओ- शुगर कॉस्मेटिक्स आणि नमिता थापर, संस्थापक - एमक्युर फार्मास्युटिकल्स हे शोचे परीक्षक असणार आहेत. अशनीर ग्रोव्हर या सीजनमध्ये दिसणार नाहीत, तर यांच्या जागी उद्योजक अमित जैन दिसणार आहेत.
हा शो कुठे व किती वाजता
'शार्क टँक इंडिया 2' हा शो सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार, रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रम ऑनलाइनदेखील OTT अॅप Sony Live वर पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. तसेच हा शो Sony Live.com (Sonyliv.Com) आणि YouTube वरदेखील प्रसारित होणार आहे.