• 27 Mar, 2023 07:19

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twisting Scoops: शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनवण्याची सुचली कल्पना, उभा केला करोडोंचा व्यवसाय!

Shark Tank

Image Source : www.businessinsider.in

Goat Milk Ice Cream: ही एक आइस्क्रीम चेन आहे ज्यामध्ये देशभरात 50 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. 2016 मध्ये सुरू झालेली ही कंपनी दरमहा सुमारे 2.5 - 2.75 कोटी रुपयांचे आइस्क्रीम विकते. लहानपणापासून जिगरी मित्र असलेल्या दोघांना शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनविण्याची व्यावसायिक कल्पना सुचली, ज्याने त्यांना काही वर्षांतच करोडपती बनवले आहे.

Shark Tank India Season 2: टीव्ही रिऍलिटी शो शार्क टँक इंडिया सीझन 2 मध्ये, उद्योजकांच्या व्यवसाय कल्पना केवळ शार्कच नव्हे तर प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करत असतात. दोन मित्रांची अशीच एक जोडी शोच्या 40 व्या भागात आली होती. लहानपणापासून जिगरी मित्र असलेल्या दोघांना शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनविण्याची व्यावसायिक कल्पना सुचली, ज्याने त्यांना काही वर्षांतच करोडपती बनवले आहे. हे दोन्ही मित्र पंजाबी असून, त्यांनी त्यांची व्यावसायिक कल्पना शार्कसमोर मांडली तेव्हा ते देखील आश्चर्यचकित झाले. याआधी भारतात कधीही शेळीच्या दुधापासून आईस्क्रीम बनविण्याची कल्पना कुठेही ऐकली नव्हती असे ते म्हणाले.

शेळीच्या दुधापासून आइस्क्रीम!

कंवरप्रीत सिंग (Kumwarpreet Singh Juneja) आणि मनमीत सिंग (Manmeet Singh Batra) हे बालपणीचे मित्र आहेत. दोघेही खासगी क्षेत्रात काम करत होते. सुट्ट्यांमध्ये, दोघांनी तुर्कीला भेट देण्याची योजना आखली, जिथे त्यांना त्यांची कंपनी Twisting Scoops सुरू करण्याची कल्पना सुचली. दोघांनी तुर्कीचे आईस्क्रीम भारतात आणण्याची योजना आखली आणि ही योजना त्यांनी 2016 मध्ये प्रत्यक्षात उतरवली देखील. शेळीच्या दुधापासून बनलेली आईस्क्रीम ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी Twisting Scoops नावाच्या कंपनीचा पाया घातला. ट्विस्टिंग स्कूप्स ही एक आइस्क्रीम साखळी आहे जी शेळीच्या दुधाचे आइस्क्रीम बनवण्यात आणि सर्व्ह करण्यात माहिर आहे. आईस्क्रीम व्यतिरिक्त, ही कंपनी बकलाव (Baklava) , मध्य पूर्व आणि तुर्की कॉफी (Middle Eastern and Turkish Coffee), कुनाफा (Kunafa), फलाफेल (Falafal) देखील विकते. आज कंपनीकडे तुर्की आइस्क्रीमचे 45 पेक्षा जास्त फ्लेवर्स उपलब्ध आहेत. त्यांचे आईस्क्रीम 79 रुपयांपासून सुरू होते.

40 कोटींची कंपनी!

Twisting Scoops ही एक आइस्क्रीम चेन आहे ज्यामध्ये देशभरात 50 पेक्षा जास्त आउटलेट आहेत. 2016 मध्ये सुरू झालेली ही कंपनी दरमहा सुमारे 2.5 - 2.75 कोटी रुपयांचे आइस्क्रीम विकते. कंपनी पूर्णपणे बुटस्ट्रॅप्ड (स्वतःहून विकसित केलेला व्यवसाय) आहे. दोन्ही मित्र 1 कोटी रुपयांच्या निधीच्या बदल्यात 2.5 टक्के इक्विटी ऑफरसह शार्क टँक इंडिया शोमध्ये पोहोचले होते. शोच्या शार्कने त्यांच्या बिझनेस मॉडेलचे आणि दोघांच्या मेहनतीचे कौतुक केले.

240 लोकांना दिला रोजगार

आपल्या कंपनीत कंवरप्रीत सिंग आणि मनमीत सिंग ट्विस्टिंग स्कूप्सद्वारे सुमारे 240 लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. दिल्लीतील कीर्ती नगर येथे त्यांचे स्वतःचे उत्पादन युनिट आहे तेथून ते त्यांच्या सर्व आउटलेटला 72 तासांच्या आत पुरवठा करू शकतात.यात एअर इंडिया कार्गो (Air India Cargo) ही त्यांची भागीदार आहे. त्यांनी त्यांचे पहिले आउटलेट चंदीगडमध्ये उघडले होते, परंतु आता हळूहळू ते देशातील 50 शहरांमध्ये पसरले आहेत. अलीकडेच त्यांनी मुंबईतील विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall, Thane) त्यांचे नवीन आउटलेट उघडले आहे. तुम्हाला देशातील बहुतेक मॉल्स, महामार्ग, विमानतळांवर ट्विस्टिंग स्कूप्सचे आउटलेट्स आढळतील. कंवरप्रीत सिंग जुनेजा आणि मनमीत सिंग यांनी वयाच्या 16 आणि 17 व्या वर्षी जी कंपनी सुरू केली होती, आज ती कंपनी 40 कोटींची वार्षिक उलाढाल करत आहे. शार्क टँक इंडिया शोमध्ये हजर झाल्यानंतर लेंटकार्टचे पीयूष बसनल आणि बोटचे अमन गुप्ता यांना 1 कोटीची ऑफर देण्यात आली होती. परंतु शार्कने करार करण्यास नकार दिला आहे. असे असले तरी ही व्यावसायिक कल्पना अनेकांना प्रेरणा देणारी आहे. सोशल मीडियावर या व्यवसायाची जोरदार चर्चा सुरू आहे.