Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI 100 Days 100 Pays campaign: निष्क्रिय बँक अकाऊंटमधील रक्कम ग्राहकांना परत करण्यासाठी आरबीआयची विशेष मोहीम

RBI 100 Days 100 Pays campaign

RBI 100 Days 100 Pays campaign: 1 जूनपासून बचत खात्यात काही बदल पाहायला मिळणार आहे. यासाठी आरबीआयने '100 डेज 100 पे' मोहीम सुरू केली आहे. Unclaimed डिपॉजिटबाबत या मोहिमेत बदल करण्यात येणार आहेत.

RBI 100 Days 100 Pays campaign: 1 जूनपासून बचत खात्यात बदल पाहायला मिळणार आहे. यासाठी आरबीआयने '100 डेज 100 पे' मोहीम सुरू केली आहे. Unclaimed डिपॉजिटबाबत या मोहिमेत बदल करण्यात येणार आहेत. बँक Unclaimed रकमेची पूर्तता करेल, जी बऱ्याच वर्षापासून पासून चेकमध्ये पडून आहे. म्हणजेच, जर एखाद्या व्यक्तीने बँकेत पैसे जमा केले असतील, परंतु त्यानंतर त्याने बँक व्यवहार बंद केले आणि त्याचे अकाऊंट बंद झाले, अशा  ग्राहकाला त्यांची रक्कम परत करण्यात येणार आहे. 

RBI ची 100 डेज 100 पे  मोहीम काय आहे? 

आरबीआयच्या परिपत्रकानुसार, ज्या खातेधारकांनी 10 वर्षांपासून त्यांच्या बचत किंवा चालू खात्यात कोणत्याही प्रकारचे व्यवहार केले नाहीत, म्हणजेच ज्यांचे खाते निष्क्रिय आहे, जर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असतील. जून 2023 पासून, बँक या खात्यांमधील रक्कम सेटल करून ग्राहकांना परत करणार आहे. 

खात्यात असलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?

  • तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना तुमची बँक, शेअर आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीची माहिती द्या.
  • यासोबतच सर्व खात्यांमध्ये निश्चितपणे केवायसी अपडेट करा
  • तुम्ही कोणतेही खाते वापरत नसल्यास ते त्वरित बंद करा.
  • यासोबतच तुमच्या सर्व एफडी खात्याची स्लिप सुरक्षित ठेवा जेणेकरून तुम्हाला एफडीची मॅच्युरिटी तारीख कळू शकेल.

अर्ज कसा करायचा?

तुमचे पैसे देखील बँकेत पडून असतील आणि तुमचे खाते निष्क्रिय असेल तर तुम्ही या मोहिमेच्या माध्यमातून तुमचे पैसे परत मिळवू शकता. यासाठी तुम्हाला बँक किंवा तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागेल आणि त्यावर तुमची सही करून  सबमिट करावा लागेल. खात्याशी संबंधित कागदपत्रे जसे की, पासबुक आई इतर काही कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत मिळेल.

कोणती कागदपत्रे लागतील?

तुमच्या हक्क न केलेल्या रकमेसाठी तुम्हाला खात्याशी संबंधित कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. अर्जासोबत ही कागदपत्रे जोडून तुम्ही बँकेला ई-मेल देखील करू शकता. तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीसह विनंती फॉर्म, पासपोर्ट आकाराच्या फोटो अॅड्रेस प्रूफची झेरॉक्स (Passport, Voter ID Card, Aadhaar Card) सबमिट करावी लागेल.

नॉमिनीला Unclaimed रक्कम मिळेल का? 

जर तुम्ही नॉमिनी असाल आणि तुम्हाला Unclaimed रकमेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आयडी प्रूफ असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी खातेधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर बँक त्या अकाऊंटबाबत डिटेल्स चेक करतील, त्या सर्व डिटेल्स बरोबर असल्यास टी रक्कम नॉमिनीला मिळेल.

source : www.abplive.com