डॉरमंट बँक खाते हे असे खाते आहे, ज्याला निष्क्रिय खाते म्हणून देखील ओळखले जाते. बँकेच्या धोरणानुसार विशेषत: 6-12 महिन्यांच्या दीर्घ कालावधीत जर तुम्ही बँक खात्यात कुठलाही व्यवहार केला नसेल तर या खात्यावर बँकेकडून कारवाई केली जाते. अशा खात्यातून खातेदार पैसे काढू शकत नाही, तसेच इतर आर्थिक व्यवहार देखील करू शकत नाही. जर तुमच्या बँक खात्यात जर मोठी रक्कम असेल तर ती सरकारजमा देखील होऊ शकते. त्यामुळे आपले खाते डॉरमॅट बँक खाते बनू नये यासाठी खातेदारांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. चला तर जाणून घेऊया नेमके काय आहे Dormant Account आणि त्याचा खातेदारावर काय परिणाम होतो.
आजकाल आपल्यापैकी अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक खाते आहेत. वेगवगेळ्या कारणांसाठी वेगवगेळ्या बँकेत खाते सुरु करण्याची प्रक्रिया आता सामान्य झाली आहे. अशातच जेव्हा कुठल्या एका खात्याकडे तुमचे दुर्लक्ष होते आणि तुम्ही त्यात कुठलेही आर्थिक व्यवहार करत नाही तेव्हा ते खाते पूर्णपणे बंद केले जात नाही, परंतु त्यावर काही निर्बंध लादले जातात. यामध्ये बँक खात्याचे स्टेटमेंट, खात्याबद्दलची माहिती, ठेवीवरील व्याज आदी गोष्टी बँकेकडून केल्या जातात. जर बँकेत तुम्ही मोठी रक्कम ठेवली असेल तर नाहक तुम्हाला आर्थिक नुकसान भोगावे लागू शकते. तसेच प्रत्येक बँकेची बँक खात्यात पैसे ठेवण्याची मर्यादा वेगवेगळी असते, बँकेचे हे नियम जर आपण पाळत नसू तर डॉरमॅट बँक खात्यावर दंड किंवा शुल्क आकारले जाते.
काही प्रकरणांमध्ये जर बऱ्याच कालावधीनंतर देखील खातेदाराने बँकेला भेट न दिल्यास किंवा केवायसी अपडेट न केल्यास बँक खात्यातील रक्कम बेनामी मालमत्ता (Unclaimed Property) म्हणून घोषित केली जाते. ही रक्कम नंतर आरबीआयकडे जमा करण्यात येते. नुकतीच 35,012 करोड रुपयांची संपत्ती देशातील वेगवेगळ्या बँकांनी बेनामी मालमत्ता म्हणून आरबीआयकडे वर्ग केली आहे.
हे नुकसान टाळण्यासाठी, खातेधारकांनी त्यांच्या खात्यांकडे नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे आणि काही ना काही आर्थिक व्यवहार त्या बँकेत होतील याची काळजी घेतली पाहिजे. शक्य असेल तर एखादी लहान रक्कम बँक खात्यात टाकण्याचा किंवा काढण्याचा प्रयत्न करावा. सध्या तर G-pay, फोन पे सारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे अगदी 10-5 रुपयांचा व्यवहार देखील तुम्ही बँक खात्याद्वारे करू शकता.
डॉरमंट बँक खाते पुन्हा कार्यान्वित कसे कराल?
तुमचे खाते निष्क्रिय असेल तर तुम्हांला बँकेकडून तुमचे खाते ‘डॉरमंट’ म्हणून वर्गीकृत केले आहे असा मेसेज येईल. हे खाते तुम्हांला पुन्हा कार्यान्वित करायचे असे तर सर्वप्रथम तुम्हांला थेट तुमच्या बँकेला भेट द्यावी लागेल. काही बँका तुमच्या मूळ शाखेत जाण्याची सूचना देखील तुम्हांला करू शकतात. बँकेत गेल्यावर तुम्हांला बँक कर्मचाऱ्यांना तुमचा खाते क्रमांक आणि आलेला मेसेज दाखवावा लागेल. त्यांनतर ते तुम्हाला केवायसी अपडेट करायला सांगतील. त्यासाठी आवश्यक तो सर्व कागदपत्रे तुम्हांला सादर करावी लागतील. यात आधार कार्ड, PAN कार्ड याचा समावेश आहे. केवायसी अपडेट झाल्यानंतर तुम्हांला 5 दिवसांच्या आता बँकेकडून पुन्हा एकदा मेसेज येईल व तुमचे बँक खाते पुन्हा कार्यान्वित केल्याचे कळवले जाईल. त्यांनत तुम्ही पुन्हा तुमचे बँक खाते पूर्ववत वापरू शकता.