सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
सोनी आणि होंडा यांनी संयुक्तपणे ही नवीन इलेक्ट्रिक कार बनवली आहे. या गाडीवर दोन्ही कंपन्या अनेक दिवस काम करता होत्या. आता मात्र नवीन वर्षात ही कार जगभरातील लोकांसमोर सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनी आणि होंडाची नवीन इलेक्ट्रिक कार 4 जानेवारी 2023 पासून कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो 2023(CES2023 )च्या माध्यमातून शोकेस केली जाऊ शकते. हा कार्यक्रम अमेरिकेतील लास वेगास येथे जानेवारीमध्ये सुरू होणार आहे.
याविषयी पुढे आलेल्या माहितीनुसार, या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये लेव्हल-3 ADAS तंत्रज्ञान असेल. या तंत्रज्ञानामुळे ही कार स्वयंचलितपणे चालवली जाता येणार आहे. म्हणजेच ती चालवण्यासाठी चालकाची गरज भासणार नाही. यासाठी कारमध्ये अनेक कॅमेरे असणार आहेत. हे AI शी लिंक केले जातील. रस्त्यावर गाडी चालवताना कॅमेऱ्यांच्या मदतीने आजूबाजूच्या रहदारीच्या माहितीनुसार गाडी चालवण्यास मदत होणार आहे. असे याचे वैशिष्ट्य पुढे आले आहे.
ही कार ड्रायव्हरशिवाय चालवत येणार आहे, एवढे एकमेव याचे वैशिष्ट्य नाही तर आणखीही काही अकर्षक वैशिष्ट्ये असणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. यामध्ये मनोरंजनावरही विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. प्रवासादरम्यान त्याची इन्फोटेनमेंट सिस्टीम Sony PlayStation-5 मध्ये बदलली जाऊ शकते, अशी माहिती देखील पुढे आलेली आहे.
Sony Honda EV ची किमत किती असेल ?
या कारची ही वैशिष्ट्ये लक्षात घेता या सोनी होंडा इलेक्ट्रिक कारची (Sony Honda EV) कारची किंमतही खूप जास्त असणार आहे. मात्र, याविषयी कंपनीकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारसंबंधी बरीच माहिती बाहेर आलेली आहे. ही कार लग्झरी सेगमेंटमध्ये आणली जाईल. त्यामुळे त्याची एक्स-शोरूम किंमत एक ते दोन कोटी रुपये असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आता ही कार भारतीय बाजारपेठेत आणली जाणार नाये. देशाप्रमाणे याच्या किमतीत फरक पडू शकतो