सुमारे दीड वर्षापूर्वी सेबीने (SEBI) सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ETF) हा गुंतवणुकीचा विकल्प गुंतवणूकदारांना उपलब्ध करून दिला होता. मार्च 2023 पर्यंत सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंडमधील असेट बेस (Asset Base) 1800 करोड पर्यंत पोहोचल्याची माहिती सेबीने दिली आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (Association of Mutual Funds in India) च्या आकडेवारीनुसार, आजघडीला बाजारात 7 सिल्व्हर ETF आहेत - निप्पॉन इंडिया सिल्व्हर ईटीएफ (Nippon India Silver ETF), आयसीआयसीआय प्रुडेंशियल सिल्व्हर ईटीएफ (ICICI Prudential Silver ETF), आदित्य बिर्ला सन लाइफ सिल्व्हर ईटीएफ (Aditya Birla Sun Life Silver ETF), एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ (HDFC Silver ETF), एक्सिस सिल्व्हर ईटीएफ (Axis Silver ETF), कोटक सिल्व्हर ईटीएफ (Kotak Silver ETF) आणि डीएसपी सिल्व्हर ईटीएफ (DSP Silver ETF). या 7 सिल्व्हर ETF मध्ये गुंतवणूकदारांनी गेल्या दीड वर्षात तब्बल 1800 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
मागील महिन्यात (एप्रिल 2023) यूटीआय सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड (UTI Silver Exchange Traded Fund) देखील सेबीने सुरु केला आहे. या फंडाला देखील ग्राहकांची पसंती मिळते आहे.
No portfolio is complete without Silver.
— Nippon India ETF (@NipponIndiaETF) May 5, 2023
Here is a smarter way to invest in Demat silver for diversification of your portfolio.
Nippon India Silver ETF
To invest: https://t.co/lRYGPttaDr#NipponIndiaETF #MutualFund #Investment #Savings #FinancialGoals #Silver #ETF pic.twitter.com/M1mBEaY4oe
काय आहे सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ETF)?
Silver Exchange-Traded Fund हा एक प्रकारचा गुंतवणूक फंड आहे जो चांदीच्या वस्तू किंवा चांदीशी संबंधित इतर मालमत्तेच्या किमतीत मोजला जातो. स्टॉकच्या शेअर्सप्रमाणेच चांदीच्या ईटीएफचा व्यवहार प्रमुख स्टॉक एक्सचेंजमध्ये केला जातो. चांदीची प्रत्यक्ष खरेदी आणि साठवणूक न करता गुंतवणूकदारांना चांदी बाजारात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जा फंड सेबीने बाजारात आणला आहे.
ज्यांना चांदीच्या बाजारात गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी चांदी ETF हा एक आकर्षक गुंतवणुकीचा पर्याय आहे. अशा प्रकारच्या चांदीच्या गुंतवणुकीत स्टोरेज खर्च नसतो, सुरक्षिततेची चिंता नसते आणि विक्री करण्याची वेळ आल्यावर खरेदीदार शोधण्याची गरज देखील नसते. त्यामुळे या फंडाला गुंतवणूकदारांनी पसंती दर्शवली आहे.
चांदीच्या ETF चे मूल्य चांदीच्या किंमतीद्वारे निर्धारित केले जाते. चांदीची जागतिक बाजारपेठेतील मागणी, चांदीचा औद्योगिक वापर आणि पुरवठ्यातील बदलांसह इतर विविध घटकांचा परिणाम चांदीच्या किमतीवर होत असतो. यामुळे, चांदीच्या ETF ची किंमत अस्थिर असू शकतात आणि त्यात अनपेक्षितपणे चढ-उतार होऊ शकतात. चांदीच्या वाढत्या आणि घसरत्या किमतीचा परिणाम सिल्व्हर एक्स्चेंज-ट्रेडेड फंडवर (ETF) पहायला मिळतो.
सिल्व्हर ईटीएफचे दोन मुख्य प्रकार आहेत, फिजिकल बॅक्ड (Physical Backed ETF) आणि फ्युचर्स बॅक्ड (Futures Backed ETF). फिजिकल बॅक्ड सिल्व्हर ईटीएफमध्ये प्रत्यक्ष चांदीचा व्यवहार असतो, तर फ्युचर्स-बॅक्ड सिल्व्हर ईटीएफमध्ये चांदीसाठी फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स (करार) असतात. फिजिकल बॅक्डसिल्व्हर ईटीएफ सामान्यतः फ्युचर्स-बॅक्ड सिल्व्हर ईटीएफपेक्षा कमी जोखमीचे मानले जातात कारण ते कुठल्याही कराराऐवजी चांदीचे भौतिक मूल्य, बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटकांवर अवलंबून असतात.
चांदीचे भाव सध्या 75 हजार किलो पर्यंत पोहोचले आहेत. सोन्याप्रामाणेच आता चांदी खरेदीसाठी ग्राहक उत्सुक असलेले दिसत आहेत.
चांदीच्या किमतीतील चढ-उतार (स्रोत : India Bullion and Jeweler's Association Ltd. (IBJA)
- ऑगस्ट 2020- 75,013 रुपये
- सप्टेंबर 2020- 57,477 रुपये
- फेब्रुवारी 2021- 73,043 रुपये
- सप्टेंबर 2021-58,118 रुपये
- मार्च 2022-70,890 रुपये
- सप्टेंबर 2022- 52,022 रुपये
- जानेवारी 2023- 68,349 रुपये
- एप्रिल 2023-74,940 रुपये
सिल्व्हर ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे हा गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये (Investment Portfolio) विविधता आणण्याचा आणि महागाईपासून बचाव करण्याचा एक चांगला मार्ग ठरू शकतो. कारण चांदी हा सोन्यासारखाच एक मौल्यवान धातू आहे आणि भारतीय संस्कृतीत या धातूला देखील विशेष महत्व आहे. त्यामुळे चांदीतली गुंतवणूक येणाऱ्या काळात एक स्मार्ट गुंतवणूक ठरू शकते.