कर्ज परतफेड आणि भूसंपादनासाठी सुमारे 1 हजार कोटी रुपये उभारण्यासाठी आयपीओ कंपनीने प्रस्तावित केला होता. Signature Global च्या या प्रस्तावाला भांडवल बाजार नियामक सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा आयपीओ येण्याची शक्यता आहे.
कशासाठी आणणार IPO?
परवडू शकतील आणि माध्यम श्रेणीतील गृहनिर्माणावर Signature Global काम करत आहे. जुलैमध्ये कंपनीने सेबीकडे प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावानुसार आयपीओमध्ये 750 कोटी रुपयांपर्यंतचे समभाग नव्याने विक्रीसाठी जारी करण्यात येतील. आणि अतिरिक्त 250 कोटी रुपये प्रवर्तक आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडील समभागांच्या आंशिक विक्रीतून उभारण्यात येणार आहेत. याअंतर्गत प्रवर्तक आणि गुंतवणूकदार इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून प्रत्येकी 125 कोटी
रुपायपर्यंतच्या इक्विटी शेअर्सची विक्री करतील. यातून मिळणारऱ्या निधीचा वापर कर्जाची परतफेड, भूसंपदानाद्वारे व्यवसाय विस्तार या उद्देशासाठी करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. या फंडाचा उपयोग सिग्नेचर ग्लोबल होम्स, सिग्नेचर इन्फ्राबिल्ड, सिग्नेचर ग्लोबल डेव्हलपर्स, स्टर्नल बिल्डकॉन या सहायक कंपन्यांची कर्जे फेडण्यासाठीही केला जाणार आहे.
Signature Global कंपनीविषयी
Signature Global दिल्ली – एनसीआर आधारित कंपनी आहे. 2014 मध्ये आपली सहाय्यक कंपनी सिग्नेचर बिल्डरच्या माध्यमातून कंपनीने काम सुरू केले. हरियाणातील गुरुग्राममध्ये सोलारा प्रकल्प सुरू केला. 6.13 एकर जागेवर हा प्रकल्प आहे. काही वर्षातच मोठ्या प्रमाणणात वाढ झाली आहे. तसेच 31 मार्च 2022 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 25 हजार 453 निवासी आणि व्यावसायिक युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. तसेच, यात विक्री करण्यास योग्य असे 14.5 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्राचा समावेश असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
IPO म्हणजे काय?
कंपन्यांना आपल्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी आणि चालू खर्चासाठी भांडवलाची गरज लागते. हे भांडवल उभे करण्यासाठी कंपन्यांकडे एक मार्ग कर्ज घेण्याचा असतो. कर्ज घेण्यापेक्षा कंपनी आपले शेअर्स विक्रीला काढून भांडवलाची सोय करण्याचा पर्याय देखील स्वीकारते. ही शेअर्स विक्री करणे म्हणजे पब्लिक इश्यू काढणे. पब्लिक इश्यूचे प्रारंभिक आणि त्यानंतरचा असे दोन भाग पडतात. प्रारंभिक पब्लिक इश्यू म्हणजेच आयपीओ (Initial public offer).