Shivneri Bus Ticket Price : एकीकडे सर्वत्र महागाई वाढत असतांना आणि पट्रोल -डिझेल, वीजबिलाचे दर सतत वाढत असतांना, राज्य परिवहन महामंडळाने, मुंबई - पुणे शिवनेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा प्रचंड लाभ होणार आहे.
प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार
नोकरीच्या निमित्ताने मुंबई - पुणे प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. अनेकदा वेळेवर न मिळणारे रेल्वेचे आरक्षण किंवा जिथे पोहचायचं असते, तिथे रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे ग्राहक बसला प्राधान्य देतात. यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एक बदल घडवुन आणला आहे. या मार्गावर इलेक्ट्रिक एसटी बस अर्थात ‘ई-शिवनेरी’ सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला, यामुळे एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ होणार आहे.
तिकीटांचा दर कमी होणार
इलेक्ट्रिक बसचा परिचालन खर्च कमी असल्याने देशभऱ्यातील राज्य परिवहन मंडळाने फेम योजनेअंतर्गत ‘ई-शिवनेरी’ बस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई - पुणे शिवनेरी तिकीट दर 70 ते 100 रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. सध्या 515 रुपये एवढा तिकिटाचा दर आहे. 1 मे पासुन तो दर 400 काही रुपये होईल.
प्रदुषण विरहीत प्रवास
राज्य परिवहन महामंडळाचा प्रिमियम ब्रँड म्हणून ओळख असलेल्या ई-शिवनेरी मध्ये वातानुकूलित आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा लाभ मिळतो. या बसची टू बाय टू अशी सिटींग अरेंजमेंन्ट आहे. आणि एकूण 43 सिट्स उपलब्ध आहे. यामुळे आता सध्या बसने किंवा शिवनेरी ने प्रवास करणारा ग्राहक देखील ई-शिवनेरी ने प्रवास करायला लागेल. शिवाय या ई बसने प्रदुषण होणार नसल्याने, याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.