Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market: IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी यासाठी महत्वाच्या टिप्स

Share Market: IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी यासाठी महत्वाच्या टिप्स

मग IPO मध्ये गुंतवणूक कशी करायची? वाचा सर्व माहिती

Initial Public Offering (IPO) इनिशियल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ हा शब्द शेअर बाजाराशी संबंधितांना अनेकदा ऐकायला मिळतो. विशेषतः गेल्या काही महिन्यात अनेक कंपन्यांचे IPO भांडवली बाजारात दाखल झाल्याने याविषयीची चर्चा सातत्याने होत असते. सध्या LIC च्या IPO ची चर्चा देशभरात सुरू होती. यानिमित्ताने IPO म्हणजे नेमके काय? कंपन्यांकडून IPO का आणले जातात आणि गुंतवणूकदारांनी त्यात गुंतवणूक करताना काय करायला हवे याविषयी जाणून घेऊया.

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास विविध कंपन्यांकडून पैसा अथवा निधी उभारणीसाठी अवलंबला जाणारा पर्याय म्हणजे आयपीओ (IPO) असे म्हणता येईल. एखादी मोठी कंपनी शेअर बाजारात त्यांचे शेअर विक्रीसाठी उपलब्ध करुन देते त्यास आयपीओ म्हटले जाते. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपन्यांकडून आयपीओ दाखल करुन निधी जमा केला जातो. गुंतवणूकदारांनी त्या आयपीओंची खरेदी केल्याने कंपनीला पैसा मिळतो आणि गुंतवणूकदारांना शेअर्स मिळतात. याखेरीज एखाद्या कंपनीचा कारभार उत्तम आहे, पण ती शेअर बाजारात नोंदणीकृत नसेल तर अशी कंपनी आयपीओच्या माध्यमातून बाजारात प्रवेश करते.

कोणतीही कंपनी सेबीच्या नियमांचे पालन करुन कितीही वेळा बाजारात आयपीओ आणू शकते.

आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या पैशातून कंपन्याना त्यांचा विस्तार करणे सुलभ जाते. हाच पैसा कर्जाऊ रुपाने घ्यायचा झाल्यास ते अधिक महागडे ठरू शकते. दुसरीकडे आयपीओमुळे कंपनीची, कंपनीच्या उत्पादनांची चर्चाही सर्वदूर होते आणि विविध पातळीवरील लोकांशी कंपनी जोडली जाते.

नफेखोरी करणार्या शेअर व्यावसायिकांसाठी आयपीओ ही एक मोठी संधी असते. पण सामान्य गुंतवणूकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सदर कंपनीबाबत सविस्तर माहिती मिळवणे गरजेचे असते. यामध्ये कंपनीचा गेल्या काही वर्षातील फायदा, कंपनीच्या उत्पादनाला भविष्यात असणार्या संधी याचेही आकलन करायला हवे.

पीई, पीबी आणि डीईचे प्रमाण पाहा
आयपीओ बाजारात आणणाऱ्या कंपन्यांची माहिती जाणून घेण्यासाठी कंपनीची Price to Earning (P/E), Price to Book (P/B) आणि Debt to Equity (D/E)च्या प्रमाणावर लक्ष देणे गरजेचे आहे. या आधारे कंपनीचे सरासरी उत्पन्न कळते. याशिवाय कंपनीची बुक व्हॅल्यू आणि कंपनीवर किती कर्ज आहे, याचे आकलन होते. कंपनीवर लोन अधिक असेल तर वेळीच सजग राहणे गरजेचे आहे. कारण कंपनी बाजारातून पैसे उभारून कर्ज फेडत असेल तर भविष्यात त्या कंपनीकडून फायदा होण्याची शक्यता कमी असते.

आयपीओच्या रेटिंगकडे लक्ष द्या
आयपीओची निवड करताना रेटिंग एजन्सीकडून मिळालेल्या रॅकिंगचा देखील विचार करायला हवा. आयपीओची निवड करण्यासाठी ही बाब साह्यभूत ठरते. रेटिंग एजन्सीकडून रॅकिंग देताना कंपनीचा मूळ स्रोत, त्याचा नफा, मागील कामगिरी, कंपनीच्या संचालकांची कुंडली याचे आकलन करते. याशिवाय शेअर ब्रोकरकडूनही कंपनीबाबत माहिती मिळवली जाते आणि नंतरच रेटिंग दिले जाते.

आयपीओ बाजारात आणल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो म्हणजे तो किती प्रमाणात विकला जातो यावर त्याचा लिस्टींगच्या वेळचा भाव अवलंबून असतो. सामान्यतः जितकी जास्त पटीने विक्री तेवढा अधिक भाव असे सूत्र असते. कंपनीकडून आयपीओची घोषणा झाल्यानंतर इच्छुकांना त्यासाठी अर्ज करावे लागतात आणि आपल्याला जितके शेअर्स हवे असतील तितके पैसेही भरावे लागतात. तथापि, अर्ज केलेल्या सर्वांनाच शेअर्स मिळतात असे नाही. काही जणांना पैसे परत केले जातात. तर काहींना थोडेच शेअर्स मिळतात.

तज्ज्ञांच्या मते, शक्यतो आयपीओ दाखल झाल्यानंतर लागलीच त्यात गुंतवणूक करावी आणि त्याला असणारी मागणी भरपूर असल्यास लिस्टिंगनंतर लागलीच विकून मोकळे व्हावे. कारण हेच शेअर्स कालांतराने कमी किमतीला मिळण्याची शक्यता असते. पेटीएमच्या आयपीओबाबत हा प्रकार सर्वांनीच पाहिला असेल.

Image Source - <a href='https://www.freepik.com/photos/ipo'>Ipo photo created by rawpixel.com - www.freepik.com</a>