शेअर बाजारात सेन्सेक्स मंगळवारी 49.49 अंकांच्या वाढीसह 59,549.90 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 13.20 अंकाच्या वाढीसह 17,662.15 अंकावर बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजार तेजीसह बंद झाला आहे. मात्र ही वाढ फार मोठी नाही. गुंतवणूकदारांची खरेदी, वेगवान आर्थिक सर्वेक्षण अंदाज आणि चांगल्या बजेटची अपेक्षा यामुळे शेअर बाजारात तेजी दिसून आली असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.
बँकिंग क्षेत्रातील समभागांमध्ये जोरदार खरेदी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे BSE सेन्सेक्स 367 अंकांच्या वाढीसह 40,754 अंकांवर बंद झाला आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 33 अंकांच्या वाढीसह 17,682 अंकांवर बंद झाला आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, ऑटो, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एफएमसीजी, धातू, मीडिया, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या समभागांमध्ये खरेदी झाल्याचे दिसून आले. आयटी, हेल्थकेअर, फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्येही विक्री झाल्याचे दिसून आले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये खरेदी दिसून येत आहे. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 16 वाढीसह आणि 14 तोट्यासह बंद झाले आहेत. निफ्टीमध्ये 50 समभागांपैकी 24 समभाग वाढीसह बंद झाले तर 26 तोट्यासह बंद झाले आहेत.
अदानी एंटरप्रायझेस FPO ने पूर्णपणे सदस्यता घेतली आहे. भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा FPO म्हणून ओळखला जात आहे, ज्याचे मूल्य 20 हजार कोटी इतके आहे. स्टेट बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंट्स प्रत्येकी 3.5 टक्क्यांनी वधारले आहेत. बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 2.2 टक्क्यांहून अधिक घसरलेले दिसून आले. फेडरल रिझर्व्हच्या निर्णयापुढे डॉलर मजबूत झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 42 पैशांनी घसरून 81.92 वर बंद झाला आहे.
अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात आला. मंगळवारी बाजार वाढीसह ओपन झाला होता. मात्र नंतर घसरण दिसून आली. मात्र अंतिमत: बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला.