Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बजाज ग्रुपच्या Bajaj Consumer Care ची शेअर बायबॅक ऑफर

Bajaj Consumer Care

Image Source : www.ndtv.com

बजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे. यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे.

बजाज समूहाची कंपनी Bajaj Consumer Care ने शेयर बायबॅक ऑफर आणली आहे.  यामुळे गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. बजाज समूहाच्या बजाज कंझ्युमर केअरने शुक्रवारी ही ऑफर जाहीर केली आहे. यानुसार, 240 रुपये प्रती शेअर अशी ही बायबॅक ऑफ असणार आहे. 

एकूण 80.89 कोटी रुपयांचे शेअर Bajaj Consumer Care  बायबॅक करणार आहे. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअर मार्केट रूटमधून 33.7 लाखांपर्यंत शेअर बायबॅक करणार आहे. शुक्रवारी कंपनीची  मुंबई येथे बैठक पार पाडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

Bajaj Consumer Care  चा शेअर्स वधारला 

शुक्रवारी BSE वर बजाज कंझ्युमर केअरचा शेअर 3 टक्क्यांनी वधारत 184.25 रुपयांवर पोहोचला होता. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा शेअर 179.65 रुपयांवर बंद झाला. या शेअरने गेल्या सहा महिन्यांत 30 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे.  10 जून 2022 रोजी BSE वर 138.55 रुपये होता. यानंतरच्या कालावधीत ही इतकी वाढ झाली आहे. गेल्या महिनाभराच्या कालावधीतही या शेअरच्या  भावात चांगली वाढ झाली आहे. FMCG कंपनी बजाज कंझ्युमर केअरचा शेअर 9 डिसेंबर 2022 रोजी बीएसईवर 179.65 वर बंद झाला. ही गेल्या एका महिन्याच्या तुलनेत कंपनीच्या शेअरमधील 18 टक्के इतकी वाढ आहे. 

52 आठवड्याच्या कालावधीत घसरण 

कंपनीच्या शेअरचा गेल्या 52 आठवड्याच्या कालावधीचा विचार केला तर त्यात घसरण दिसून येत आहे. या कालावधीत 10 टक्के इतकी घसरण झाली. 52 आठवड्यातील नीच्चांकी स्तर 129.25 तर उच्चांकी स्तर 207.45 रुपये इतका राहिला.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)