Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan Box Office Collection Day 3: जगभरात शाहरूख खानच्या 'पठाण'चा जलवा, तीन दिवसात कमविले 300 कोटी रूपये

Pathan Box Office Collection Day 3

Image Source : http://www.sacnilk.com/

Pathan Movie: शाहरूख खानच्या 'पठाण' चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच या चित्रपटाने बाॅलिवुडचे विविध रेकाॅर्ड तोडत जगभरातील बाॅक्स आॅफिसवर कब्जा केला आहे.

Pathan Movie: शाहरूख खान (Shahrukh Khan) च्या पठाण चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. तसेच या चित्रपटाने बाॅलिवुडचे विविध रेकाॅर्ड तोडत जगभरातील बाॅक्स आॅफिसवर कब्जा केला आहे. शाहरूख खाननेदेखील चार वर्षानंतर धमाकेदार एन्ट्री केली आहे. संपूर्ण देशभरात पठाण चित्रपटाचा धुमाकूळ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची क्रेझ पाहता, स्क्रिनिंगसाठी बंद पडलेले थिएटरदेखील सुरू करण्यात आले आहेत.

पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन (Pathan Movie Box Office Collection)

पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने ओपनिंग डे ला देखील फक्त अॅडव्हाॅन्स बुकिंगव्दारे 50 कोटीं रूपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. ओपनिंग डे ला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्येदेखील पठाणचा समावेश झाला आहे. तसेच दुसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाने तगडी म्हणजेच 68 कोटी रूपयांची कमाई केली आहे. मात्र तिसऱ्या दिवशी या दोन दिवसांच्या तुलनेत थोडी कमी कमाई केली आहे. या दिवशी पठाणने बाॅक्स आॅफिसवर 35 कोटींचा गल्ला जमा केला. तीन दिवसात एकूण या चित्रपटाने भारतात 158 कोटी रूपयांची कमाई केली. तर जगभरात या चित्रपटाने 300 कोटी रूपये कमविले आहे. 

भारतातील बाॅक्स आॅफिस कलेक्शन (Box office collection in India) 

पठाण या चित्रपटाने भारतात पहिल्याच दिवशी 55 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 68 कोटी गल्ला जमा केला असून तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 35 कोटी रूपये इतकी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या गाणे, ट्रेलर प्रदर्शनापासून हा चित्रपट बऱ्याच वादग्रस्त परिस्थितीत अडकला होता. मात्र पठाण ची ही कमाई पाहता, त्याचा या चित्रपटावर काहीच परिणाम झाले असल्याचे दिसत नाही. याउलट या चित्रपटाच्या शो साठी बंद पडलेले थिएटर सुरू झाले. तसेच जगभरात हा चित्रपट आठ हजार थिएटरवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकले आहे.  हा चित्रपट वीकेंडला आणखी 200 करोड टप्पा पार करेल असा अंदाज सिनेविश्लेषकांचा आहे.