Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pathan New Update: पठाण जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित, पहा जगभरातून किती कोटींची केली कमाई? KGF 2 ला ही टाकले मागे!

Pathan New Update

Image Source : http://www.antvklik.com/

Pathan Box Office Collection: शाहरूख खानचा 'पठाण' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरदेखील ठरला बादशाह. या चित्रपटाने काल म्हणजे 26 जानेवारी 2023 सुट्टीच्या दिवशी साधारण 70 करोडची कमाई केली असल्याचे ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी सांगितले. हा चित्रपट अनेक चित्रपटांचे रेकाॅर्डस मोडत बॉक्स ऑफिसवर राज्य करीत आहे.

Pathan Collection: शाहरूख खान (Shahrukh Khan) व दिपिका पदुकोन (Deepika Padukone)च्या पठाण चित्रपटाने देश-विदेशाच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट एकापाठोपाठ एक रेकाॅर्ड तोडत नवीन रेकाॅर्ड बनवित आहे. एवढेच नाही, तर या चित्रपटाने KGF 2 चा देखील रेकाॅर्ड मोडला आहे. दुसऱ्याच दिवशी या चित्रपटाने 120 करोडचा टप्पा पार करून एक नवीन इतिहास रचला आहे.  

सर्वाधिक ओपनिंग मिळविणारा चित्रपट (Film with Highest Opening)

पठाण हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बंद पडलेले थिएटरदेखील पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. अशा या जगभरात धुमाकूळ घातलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा गल्ला जमा केला. तर जगभरातून या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा ही अधिक कमाई केली आहे. पठाण हा चित्रपट अनेक बाॅलिवुड चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडत सर्वाधिक ओपनिंग मिळविणारा चित्रपट ठरला आहे.

पहिल्याच दिवशी किती स्क्रीन्स वाढविल्या? (How many Increased Screens on the First Day)

पठाण हा चित्रपट जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी बंद पडलेले 25 थिएटरदेखील पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. हिंदी, तामिळ व तेलगूसह हा चित्रपट 5500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच परदेशात हा चित्रपट 2500 स्क्रीन्सवर रिलिज केला. मात्र या चित्रपटाचा तुफानी वेग पाहता, आणखी 300 स्क्रीन्स वाढविण्यात आल्या असल्याचे चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले. 

KGF Chapter 2 ला टाकले मागे (KGF Chapter 2's Broken Record)

काही महिन्यांपूर्वी केजीएफ 2 या चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 53.95 कोटींची कमाई केली होती. तसेच ऋतिक रोशनच्या  'वॉर’ चित्रपट 51.6 कोटींचा गल्ला जमा करून या यादीत तिसऱ्या नंबरवर होता. आता मात्र या दोन्ही चित्रपटांचा रेकाॅर्ड तोडत पठाण ओपनिंग डे ला म्हणजेच पहिल्याच दिवशी 55 कोटींचा गल्ला जमवून सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान प्राप्त केले आहे.