Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shah Rukh Khan Cars Collection: जाणून घ्या, बाॅलिवुडचा बादशाह शाहरूख खान याच्याकडील लक्झरी कार्सचे कलेक्शन व किंमती

Shah Rukh Khan Cars Collection

Image Source : http://www.siasat.com/

Shah Rukh Khan: बाॅलिवुडचा बादशाह शाहरूख खान हा सध्या पठाण (Pathan) चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहेत. त्याचे चाहते त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक करीत आहेत. मात्र शाहरूखवर प्रचंड प्रेम करणाऱ्या चाहत्यांना माहिती आहे का, शाहरूख खान जवळ किती कार्स असून त्याच्या किंमती काय आहेत?

Shah Rukh Khan Luxury Cars Collection and Price: बाॅलिवुडचा किंग खान शाहरूखने तब्बल चार वर्षानंतर पठाण चित्रपटाव्दारे मोठया पडदयावर पुनरागमन केले आहे. त्याचा हा चित्रपट आजच प्रदर्शित झाला असून, त्याच्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बाॅक्स आॅफिसवर अॅडव्हाॅन्स बुकिंगव्दारे कोटी रूपये कमविले आहे. बाॅलिवुडच्या या किंग खानकडे कोणत्या आलिशान कार्स आहेत व त्यांच्या काय किंमती आहेत हे जाणून घेवुयात.

Bugatti Veyron

शाहरुख खानजवळ बुगाटी वेरॉन नावाची लक्झरी कार आहे. या कारची किंमत सुमारे 12 कोटी रूपये आहे.

BMW i8

अभिनेता शाहरूख खानकडे एक स्पोर्ट्स कारदेखील आहे. या कारचे नाव बीएमडब्ल्यू i8 असे आहे. तसेच त्याच्याकडे BMW 6-सीरीज कन्व्हर्टेबलदेखील असल्याचे सांगितले जात आहे. या गाडयांची किंमत अनुक्रमे 2.14 कोटी व 1.19 कोटी रूपये आहे.

Rolls Royce Phantom Drophead Coupe

बाॅलिवुडच्या बादशाहच्या आलिशान गाडयामध्ये Rolls Royce Phantom Drophead Coupe चा ही समावेश आहे. याची किंमत सुमारे 7.6 कोटी रूपये इतकी आहे. 

Land Rover Range Rover Sport

शाहरुख खानच्या आलिशान गाडयांमध्ये रोव्हर रेंज रोव्हर स्पोर्ट एसयूव्ही ही कारदेखील आहे. या कारची किंमत 2.19 कोटी रुपये आहे.

Toyota Land Cruiser

शाहरुख खानकडे Toyota Land Cruiser सहित ऑडीची लक्झरी सेडान ऑडी A8L या लक्झरी कारदेखील आहे. ज्याची किंमत अनुक्रमे दीड कोटी व 1.57 कोटी रूपये इतकी आहे.

Vanity Van Volvo BR9

 शाहरुख खानकडे एक आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहे. जी खास किंग खानसाठी तयार करण्यात आली आहे. याची किंमत सुमारे 4 कोटी रूपये आहे.

Bentley Continental GT

शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत बंगल्यातील गॅरेजमध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी ही लक्झरी कार आहे. या कारची किंमत साधारण 3.57 कोटी रुपये आहे.

BMW 7-Series

शाहरुख खानच्या लक्झरी कार्समध्ये BMW 7 सीरीज कारचा देखील समावेश आहे, ज्याची किंमत साधारण 2.82  कोटी रुपये आहे.