Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sensex Opening Bell: मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत

Sensex Opening Bell

Sensex Opening Bell: सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे.

मागचा आठवडा पूर्णत: आणि या आठवड्याच्या सुरुवातीपासून सेन्सेक्समध्ये घसरण होत आहे. आज ही पडझड थांबून उभारी मिळणार की अशीच सुरू राहणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र  सलग 7 दिवसांच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झालेली बघायला मिळाली आहे. सेन्सेक्सही सुरुवातीच्या ट्रेडमध्ये वधारला आहे. निफ्टीमध्ये चढ उतार पाहायला मिळत होते. 

सुरुवातीच्या टप्प्यामध्ये सेन्सेक्समध्ये किंचित घसरण झालेली बघायला मिळाली. मात्र नंतरच्या टप्प्यात 180 अंकांच्या पुढे वाढ होताना दिसत होती.  सेन्सेक्स, निफ्टी मागील आठवड्याप्रमाणेच काल  सोमवार 27 फेब्रुवारी रोजी घसरणीसह बंद झाले होते.  बँकिंग स्टॉकमध्ये खरेदी होताना दिसत  होती  तर मेटल, आयटी, ऑटो आदी क्षेत्रांच्या स्टॉकमध्ये घसरण दिसून आली होती.  फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा समभागांवर प्रेशर दिसून आले तर   व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 175.58 अंकांनी म्हणजेच 0.30 टक्क्यांनी घसरून 59 हजार 288.35 वर बंद झाला होता.   निफ्टी 73.10 अंकांनी म्हणजेच 0.42 टक्क्यांनी घसरून 17 हजार 392.70 वर बंद झालेला बघायला मिळाला. या पार्श्वभूमीवर आज बाजार उघडताना काय स्थिती असणार आहे त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. 

मॉर्निंग ट्रेडमध्ये 'हे' शेअर्स वधारले 

मॉर्निंग ट्रेडमध्ये बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, The new India assurance compony ltd यांच्यामध्ये वाढ झाली. सकाळच्या सुरुवातीच्या काही मिनिटात द न्यू इंडिया 4 टक्क्यापेक्षा अधिक तर बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा 2 टक्क्याहून अधिक किमतीने वधारले आहेत. सध्या जागतिक बाजारपेठेत कमजोरी असून गेल्या आठवड्यात डाऊ जोन्समध्ये सलग चौथ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली होती.  काल  सकाळी आशियाई बाजारावर खूप दबाव होता आणि सर्व प्रमुख निर्देशांकात घसरण झालेली बघायला मिळाली  होती. अमेरिकेत पुन्हा एकदा महागाई वाढल्याने फेड रिझव्‍‌र्ह पुढील दोन-तीन बैठकांमध्ये व्याजदर वाढवू शकतो, असा कयास आता बाजारातील निरीक्षकांकडून बांधण्यात आला. कॅलेंडर वर्ष 2023 मध्ये, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 31 हजार कोटी रुपयांचे समभाग विकण्यात आले  असून  त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारांवरही दिसून येत  असल्याचेही विश्लेषण करण्यात येत आहे. 
हिंडेनबर्ग अदानी ग्रुपविषयी अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर देशात खळबळ निर्माण झाली होती. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण बघायला मिळत आहे. यामुळे अदानी यांच्या कॅपिटलमध्येही घसरण होत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत  तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी त्यांची ओळख बनली होती. मात्र हा अहवाल जाहीर झाल्यानंतर प्रथम ते 10 क्रमांकावर फेकले गेले होते. यात वारंवार घसरण होत आता ते 38 व्या स्थानावर पोचले आहेत.