बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाल्यानंतर सेन्सेक्स, निफ्टी प्रमाणेच बँक निफ्टी 29 अंकांनी घसरून 42703 वर उघडला. बुधवारी घसरणीने बाजाराची सुरुवात झाली. सेन्सेक्स 144 अंकांनी घसरून 60834 वर आणि निफ्टी 18093 वर उघडला. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत झालेले बघायला मिळाले.
आठवड्याच्या या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी मारुती सुझुकीच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून येत आहे. तिमाही निकालांमध्ये कंपनीचे निकाल उत्कृष्ट आहेत, हे यामागचे कारण विश्लेषक सांगत आहेत. त्याचवेळी निकालापूर्वी टाटा मोटर्सचे शेअर्सही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. प्रजासत्ताक दिन या दिवशी म्हणजेच उद्या 26 जानेवारी रोजी बाजारात सुट्टी आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया 11 पैशांनी मजबूत झाला
शेअर मार्केट अनेक प्रकारच्या घडामोडी प्रभाव पाडत असतात. त्यावर ट्रेडर्स लक्ष ठेऊन असतातत. बुधवारी म्हणजेच 25 जानेवारी 2023 रोजी रुपया 11 पैशांनी मजबूत होऊन डॉलरच्या तुलनेत 81.61 वर उघडला. मागील ट्रेडिंग सत्रात तो 81.72 च्या पातळीवर बंद झाला होता. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये 84.3 लाख शेअर्सची ब्लॉक डील झाल्याची माहिती देण्यात येत आहे. ही डील 101.8 कोटींमध्ये झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्रति शेअर किंमत 120.7 रुपये निश्चित करण्यात आली आहे. टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. या डीलच्या वृत्ताने कंपनीच्या शेअर्समध्ये अर्धा टक्का वाढ दिसून येत असल्याचे विश्लेषण केले जात आहे. 23 आणि 24 जानेवरी असे सलग दोन दिवस बाजार उघडताना जी वाढ दिसली त्याला तिसऱ्या दिवशी ब्रेक लागला आहे. तिसऱ्या दिवशी मात्र हिरव्या चिन्हासह बाजार खुला होऊ शकला नाही.