Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Share Market Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सेन्सेक्स, निफ्टी वाढीसह सुरुवात

Share Market Today

Share Market Today : जागतिक मार्केटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीनंतर मंगळवारी देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसून आली. आठवड्याच्या दुसर्‍या दिवशी शेअर बाजार सेन्सेक्स आणि निफ्टी वाढीसह उघडले.

सेन्सेक्स 180 अंकांनी मजबूत होत 61122 अंकांच्या  पातळीवर उघडले आणि निफ्टीने 18184 अंकांच्या  पातळीवर 65 अंकांच्या आधिक्याने  उघडले. या कालावधीत, बँक निफ्टीमध्ये 173 अंकांच्या वाढीसह 42994 गुणांच्या पातळीवर ट्रेड  सुरू झाला. सुरुवातीच्या ट्रेडमध्ये शेअर बाजाराने 300 अंकांपर्यंत झेप घेतली होती.

मंगळवारी, पीएसयू बँक आणि आयटी निर्देशांकाच्या शेअर्समध्ये शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एशियन पेंट्स ग्रीन मार्कवर ट्रेड  करताना दिसतात. दुसरीकडे, सन फ्रॅम, कोटक बँक, नॅस्ले इंडिया आणि भारती एअरटेलचे शेअर्स रेड मार्कवर ट्रेड करीत आहेत. मारुती, टीव्हीएस मोटर्स, पीएनबी हाऊसिंग फायनान्स सारख्या कंपन्याच्या कामगिरीवर देखील ट्रेडर्सचे लक्ष आहे. त्याच वेळी, रुपयाने 80.50 पातळीवर डॉलरच्या तुलनेत 11 पैसे कमकुवत केले आहेत. अनेक महत्वाच्या आर्थिक व संबंधित घडामोडी शेअर बाजारावर प्रभाव टाकत असतात. यातून बाजारात चढ उतार बघायला मिळतात. यामुळे ट्रेडर्स या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन असतात. Day trading, scalping करणारे यांचे शेअरमधल्या चढ उतारावर बारीक लक्ष असते. यामुळे त्यांना कुठला ट्रेड कधी घ्यायचा याविषयीचा निर्णय घेता येतो.

गेल्या आठवड्याच्या शेवटचे दोन दिवस मार्केटमध्ये घसरण झाली होती. यानंतर या आठवड्याची सुरुवात कशी होते याकडे ट्रेडर्सचे लक्ष होते. मात्र सोमवारी आठवड्याची सुरुवात  वाढीसह झाली होती. सोमवारी बाजार क्लोजही हिरव्या चिन्हासह झाला. सोमवारी, सेन्सेक्स 319.90 अंकांच्या  बळकटीसह 60,941.67 अंकांवर  बंद झाला. यावेळी, निफ्टीने 90.90 अंकांची वृद्धी करत 18,118.55 अंकांच्या पातळीवर मार्केट क्लोज केले. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही मार्केटमध्ये वाढ बघायला मिळत आहे. काही शेअर्स intraday traders ना चांगला परतावा मिळवून देत आहेत.