Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Senior Citizen Investment Options: ज्येष्ठ नागरिकांनी 'या' ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केली, तर म्हणतारपण जाईल सुखात

Senior Citizen Investment Options

Senior Citizen Investment Options: वृद्धपकाळात सन्मानाने जगायचे असेल, तर ज्येष्ठ नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी. जेणेकरून पुढील आयुष्य सुखात जगता येईल. त्यामुळे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय जाणून घेऊयात.

प्रत्येकाने आपल्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवणे गरजेचे आहे. ज्यामुळे भविष्यात सन्मानाने जगता येईल आणि कोणापुढेही लाचारीने हात पसरावे लागणार नाहीत. जे लोक ज्येष्ठ नागरिकांच्या कक्षेत येत आहेत, त्यांनी सरकारी आणि खासगी अशा दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करायला पाहिजे. जेणेकरून वृद्धपकाळात शरीर थकल्यावर त्या पैशाच्या साहाय्याने पुढील आयुष्य सुखकर पद्धतीने आणि सन्मानाने जगता येईल. वृद्धपकाळात मेडिकल इमर्जन्सी, बाहेर फिरायला जाणे व इतर खर्चासाठी ही गुंतवणूक कामी येते. त्यासाठी आत्तापासूनच काही ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करायला हवी. ती कुठे करायची, जाणून घेऊयात.

मुदत ठेव योजना (Fixed Deposit Scheme)

बँकेच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतवता येतात. ज्यावर बँक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर देते. याशिवाय बँकेकडून इतर सुविधा देखील दिल्या जातात. मुदत ठेवीमध्ये गुंतलेला पैसा हा अधिक सुरक्षित मनाला जातो. विशेष म्हणजे सामान्य नागरिकांच्या तुलनेत जास्त व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळतो. सरकारी आणि खासगी बँका ज्येष्ठ नागरिकांना 7% ते 9% दरम्यान व्याजदर देतात.

सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS)

सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS) चालवण्यात येते. यातील गुंतवणूक ही देखील अधिक सुरक्षित मानली जाते. या गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना सर्वोत्तम व्याजदर मिळत असल्याने सर्वाधिक परतावा मिळतो. यामध्ये  30 लाखांपर्यंतची कमाल रक्कम गुंतवली जाऊ शकते. सध्या या योजनेत 8.2% वार्षिक व्याजदर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे यातील गुंतवणुकीवर कर सवलतीचा लाभ घेता येतो.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS)

पोस्टाकडून अनेक गुंतवणूक योजना वेगवेगळ्या गटासाठी राबवल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS). याचे वैशिष्ट्ये म्हणजे गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला यातून कमाई करता येते. या योजनेचा परिपक्व कालावधी 5 वर्षाचा असतो. सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर पोस्टाकडून 7.4% व्याजदर देण्यात येत आहे.

प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)

सरकारकडून चालवण्यात आलेली आणखी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY). ही एक इन्शुरन्स लिंक्ड पेन्शन योजना आहे. ही योजना LIC च्या माध्यमातून चालवली जाते. या योजने अंतर्गत 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक जे मासिक पेन्शनचा पर्याय निवडतात, त्यांना 10 वर्षासाठी 8% व्याज मिळणार आहे. जर त्यांनी वार्षिक पेन्शनचा पर्याय निवडला तर, त्यांना  8.3% व्याजदर मिळेल. यामध्ये 15 लाखांची कमाल गुंतवणूक मर्यादा देण्यात आली आहे.

म्युच्युअल फंड (Mutual fund)

ज्येष्ठ नागरिक डेट ओरियंटेड म्युच्युअल फंड किंवा हायब्रीड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात. फिक्स्ड इनकम इन्स्ट्रुमेंट असणाऱ्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर देखील सर्वाधिक व्याज मिळते. मात्र ही गुंतवणूक मार्केटमधील जोखमीच्या अंतर्गत येते. त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा  आणि मगच गुंतवणूक करावी.

Source: hindi.moneycontrol.com