SCSS Gives Interest Above 8 Percent: केंद्र सरकारने 60 वर्षांवरील नागरिकांसाठी ‘ज्येष्ठ नागरिक बचत योजना’ (SCSS) सुरु केली आहे. या योजनेत 60 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. सध्या सरकारने या योजनेसाठी एप्रिल ते जून 2023 या कालावधीसाठी 8.2 टक्के व्याजदर निश्चित केला आहे. SCSS हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय असून, सर्वात जास्त व्याज देणारा पर्याय ठरत आहे. मात्र, या योजनेचे जसे फायदे आहेत; तसेच त्याचे तोटे देखील आहेत. गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे या योजनेत गुंतवण्यापूर्वी या योजनेचे फायदे आणि तोटे लक्षात घ्यायला हवे.
Table of contents [Show]
कर लाभ
गुंतवणूकदारांना इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेवर लाभ मिळतो. यामध्ये 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कपातीचा लाभ घेता येऊ शकतो.
सुरक्षित गुंतवणूक पर्याय
सरकारद्वारे राबविला जाणारा SCSS हा सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. SCSS मध्ये डिफॉल्ट किंवा तोटा होण्याची शक्यता कमी आहे. नागरिक या योजनेत 30 लाख रुपये जमा करु शकतात.
मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो
खाते उघडल्यापासून एक वर्षानंतर गुंतवणूकदार त्यांचे पैसे काढू शकतात. एखाद्या व्यक्तीने खाते उघडल्यानंतर एका वर्षाच्या आत खाते बंद करण्याचा निर्णय घेतल्यास, त्यावर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. केवळ मूळ रक्कम परत केली जाईल.
खाती देशभरात हस्तांतरित होतात
जर गुंतवणूकदार इतर ठिकाणी राहायला गेला, तर तो त्याच्या जवळच्या बँक/पोस्ट ऑफिस शाखेत सहजपणे आपले खाते हस्तांतरित करु शकतो.
खातेदाराने व्याजाचा दावा केला नसल्यास
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत दर तिमाहीला व्याज दिले जाते. मात्र, खातेदाराने व्याजाचा दावा केला नसेल,तर पुढे कोणतेही व्याज मिळत नाही. आर्थिक वर्षात एकूण व्याज 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास SCSS खात्यातील व्याजावर TDS कापला जातो.