एप्रिल महिन्यात करबचत (Tax saving) करणार्या ईएलएसएस फंडांमध्ये केवळ 61 कोटी रुपयांची गुंतवणूक (Invest) आली. तर मार्चमध्ये एकूण 2685 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची नोंद झाली. एएमएफआय डेटानुसार (Association of Mutual Funds of India), जानेवारी-मार्च तिमाहीत या प्रकारामध्ये एकूण 5080 रुपयांची आवक नोंदवली गेलीय. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, मार्चमध्ये करबचतीमुळे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममधील (Equity linked savings scheme) ओघ वाढत असतो. आता तुमच्यासाठी काही खास फंड (Funds) घेऊन आलो आहोत. हे टॉप 7 फंड तुम्हाला लखपती बनवतील...
Table of contents [Show]
एसआयपीसाठी टॉप-7 ईएलएसएस फंड
- बंधन टॅक्स अॅडव्हान्टेज (ELSS) फंड (Bandhan Tax Advantage Fund)
- एचडीएफसी टॅक्ससेव्हर - ग्रोथ (HDFC Taxsaver - Growth)
- कोटक टॅक्स सेव्हर फंड (Kotak Tax Saver Fund)
- डीएसपी टॅक्स सेव्हर फंड (DSP Tax Saver Fund)
- मिरे अॅसेट टॅक्स सेव्हर फंड (Mirae Asset Tax Saver Fund)
- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाँग टर्म इक्विटी फंड (कर बचत) (ICICI Prudential Long Term Equity Fund
- कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर फंड (Canara Robeco Equity Tax Saver Fund)
3 वर्षांचा लॉक-इन कालावधी
कर बचत इक्विटी लिंक्ड बचत योजनांसाठी साधारणपणे 3 वर्षांचा लॉक-इन पिरियड आहे, हे आपल्याला माहीत आहेच. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळू शकतो. हे इक्विटी प्रकाराच्या अंतर्गत येतं. इक्विटीमध्ये किमान 65 टक्के गुंतवणूक केली जाऊ शकते.
क्वांट टॅक्स प्लॅननं दिला सर्वाधिक परतावा
एएमएफआयच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 मे पर्यंतच्या कामगिरीवर आधारित क्वांट टॅक्स प्लॅननं 3 वर्षांमध्ये सर्वात जास्त 43.64 टक्के परतावा दिलाय. बंधन टॅक्स अॅडव्हांटेज (ELSS) फंड परताव्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर दिसून येतोय. बंधन टॅक्स अॅडव्हांटेज फंड ही ब्रोकरेजच्या आवडत्या योजनांपैकी एक आहे.
किमान एसआयपी 1000 रुपयांची
बंधन टॅक्स अॅडव्हांटेज फंडानं तीन वर्षांच्या कालावधीत एसआयपी गुंतवणूकदारांना वर्षाच्या कालावधीच्या आधारावर सरासरी 20 टक्के परतावा दिलाय. जर एखाद्या गुंतवणूकदारानं या योजनेत 3 वर्षांपूर्वी एकरकमी गुंतवणूकदारांसाठी 10,000 रुपयांची एसआयपी सुरू केली असती, तर आज त्याचं मूल्य सरासरी 4.82 लाख रुपये झालं असतं. गुंतवणुकीची एकूण रक्कम 3.6 लाख रुपये असणार आहे. किमान एसआयपी 1000 रुपयांची करता येवू शकते.
तीन वर्षांपूर्वी साधारणपणे बंधन टॅक्स अॅडव्हांटेज फंडमध्ये 1 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असती तर त्याचं मूल्य आज 2.6 लाख रुपये झालं असतं. यात निव्वळ परतावा 160 टक्के आहे. तर वार्षिक सरासरी परतावा 37.58 टक्के आहे. या माध्यमातून किमान 500 रुपये जमा करता येणार आहेत. सर्वच योजनांच्या माध्यमातून भरघोस असा परतावा दिला जात आहे. जोखीम असली तरी मागच्या काही महिन्यात इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्सना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. साधारण कालावधी तीन वर्षांचा गृहीत धरण्यात आला आहे. वरील सर्वच योजना या लोकप्रिय आहेत. मात्र गुंतवणूक करताना प्रत्येकाच्या गरजा आणि अपेक्षा भिन्न असू शकतात. अशावेळी आपल्या आर्थिक स्थितीनुसार कोणता फंड आपल्यासाठी योग्य राहील, परतावा निश्चित किंवा मोठ्या आकड्यांत मिळणार आहे का, हे गुंतवणुकीपूर्वीच जाणून घेणं गरजेचं आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)