Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

दिवाळीच्या तोंडावर कर्जे महागली! 'SBI' चा कर्जदारांना जोरदार झटका, कर्जदर वाढवला

SBI Interest Rate Hike

SBI Hike BPLR: महगाईचा वाढता आलेख आणि रिझर्व्ह बँकेची संभाव्य रेपो दरवाढ लक्षात घेत बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे.देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आज बेस रेट (कर्जाचा किमान दर) बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट (BPLR)तब्बल 0.70% वाढवला.

भारतीय स्टेट बँकेने आज बेस रेट (कर्जाचा किमान दर) बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट (BPLR)तब्बल 0.70% वाढवला.(SBI Hike Base rate and BPLR by 70 basis points) व्याजदर वाढवल्यानंतर 'एसबीआय'चा कर्जाचा आधार दर हा 8.70% इतका वाढला आहे. बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट हा 13.45% झाला आहे. आज 15 सप्टेंबर 2022 पासून सुधारित कर्जदर लागू झाले असल्याचे 'एसबीआय'ने म्हटलं आहे.रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वीच 'एसबीआय'ने कर्जदर वाढवल्याने गृहकर्ज, वाहन कर्ज आणि सर्वच प्रकारची कर्जे महागली आहेत. यापूर्वी जून महिन्यात बँकेने कर्जाचा आधार दर वाढवला होता.

'एसबीआय'च्या वेबसाईटनुसार बँकेचा BPLR 13.45% इतका झाला आहे. यापूर्वी बँकेचा BPLR 12.75% होता.  याशिवाय बेस रेट 8.70% झाला आहे. बेस रेट हा कर्जाचा किमान व्याजदर आहे. आधार दरानुसार बँका कर्ज मंजुर करत असतात. आधार दरात वाढ झाल्याने आता बदलत्या व्याजदरांनुसार कर्ज घेतलेल्या कर्जदारांचा मासिक हप्ता वाढणार आहे. त्यांच्याकडे मासिक हप्ता वाढवण्याचा (Increased EMI) किंवा कर्जाची मुदत वाढवण्याचा (Tenure Extention) पर्याय असेल.  

SBI ने यापूर्वीच 'MCLR'मध्ये केलीय मोठी वाढ (SBI Hike MCLR )

स्टेट बँकेने गेल्या महिन्यात एमसीएलआर दर 0.20% वाढवला होता. (SBI Raised MCLR) बँकेच्या वेबसाईटनुसार एमसीएलआर दर एक वर्षासाठी 7.70% इतका वाढला आहे. दोन वर्षांसाठी MCLR  एप्रिलपासून एसबीआयने पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली होती. यातून एकूण 0.70% टक्क्याने कर्जाचा दर वाढला.एप्रिल,मे आणि जुलै या महिन्यात बँकेने 'एमसीएलआर'0.10% वाढवला होता.त्यानंतर जूनमध्ये बँकेने कर्जदर 0.20% वाढवण्यात आला.16 ऑगस्ट 2022रोजी तो आणखी 0.20% वाढवण्यात आला होता. 

'SBI'चा शेअर तेजीत

शेअर बाजारात SBI चा शेअर बुधवारी तेजीत होता. बुधवारी 14 सप्टेंबर 2022 रोजी SBI चा शेअर 3% वाढीसह 574.7 रुपयांवर बंद झाला. शेअर बाजारात चौफेर विक्री सुरु असताना SBI चा शेअर 574.65 रुपयांवर गेला होता. आज गुरुवारी 15 सप्टेंबर 2022 रोजी SBI चा शेअर 571.75 रुपयांवर पोहोचला आहे. त्यात 0.10% वाढ झाली.

पतधोरणात रेपो दरवाढ जवळपास निश्चित

नुकताच ऑगस्ट महिन्यातील महागाईची आकडेवारी जाहीर झाली होती. देशातील महागाईचा दर 7% इतका वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या महागाई नियंत्रणाच्या टार्गेटच्या तुलनेत तो अधिक आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचे टार्गेट  4% आहे.किमान 2% आणि कमाल 6% या दरम्यान महागाई दर नियंत्रणात ठेवण्याचे ‘आरबीआय’ने लक्ष्य आहे.महागाई आटोक्यात आणण्यासाठी आगामी पतधोरणात रेपो दरवाढ निश्चित मानली जात आहे.येत्या 30 सप्टेंबर 2022 पासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक सुरु होणार आहे. महागाईचा भडका पाहता आरबीआय रेपो दर किमान 0.50% वाढवेल, असे बोलले जात आहे.