Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Recharge Plan: जिओ फायबरच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा-कॉलिंग आणि 14 App चे सबस्क्रिप्शन

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan: जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सना 14 App चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे, तसेच डेटा आणि कॉलिंगसुद्धा फ्री आहे. 599 रुपयांच्या या रिचार्ज प्लॅनचे डिटेल्स माहित करून घ्या.

Jio Recharge Plan: तुम्ही जर Jio Fiber वापरत असाल तर 599 रुपयांचा हा रिचार्ज तुमच्यासाठी. एका रिचार्जमध्ये अमर्यादित डेटा आणि कॉलिंग सुविधेचा आनंद घेऊ शकता. यासोबतच 14 OTT App चे  फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा  दिले जात आहे. या प्लॅनमध्ये 30 mbps चा हाय स्पीड उपलब्ध आहे. म्हणजेच या रिचार्ज मध्ये कॉलिंग डेटा आणि OTT प्लॅटफॉर्म सर्वांचा रिचार्ज होतो. या प्लॅनबद्दल सर्व माहिती जिओच्या अधिकृत वेबसाईटवर दिली आहे.

599 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 

Jio चा 599 रुपयांचा हा एक फायबर प्लान आहे. म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला 18% GST भरावा लागेल. यामध्ये तुम्हाला 120 रुपयांपेक्षा जास्त कर भरावा लागेल. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनची ​​किंमत सुमारे 710 रुपये असेल. हे बिल प्रत्येक महिन्याच्या शेवटी तयार केले जाईल. या प्लॅनमध्ये 399 रुपयांचे मेन रिचार्ज आणि 200 रुपये App सबस्क्रिप्शन आहेत. 

रिचार्ज प्लॅन डिटेल्स 

जिओच्या 599 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटा मिळेल. यामध्ये यूजर्सना 30mbps डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग स्पीड मिळेल. अशा प्रकारे यूजर्स त्यांना हवा तेवढा डेटा वापरू शकतात. तसेच, मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही दिवसभरात कितीही कॉल करू शकता. या प्लॅनचे वैशिष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला मागणीनुसार 550 हून अधिक टीव्ही चॅनेल मिळतात.

हा प्लॅन एका महिन्यात सुमारे 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना सुमारे 14 मोफत OTT App चे सबस्क्रिप्शन मिळते. या प्लॅनमध्ये Disney Plus Hotstar, SonyLIV, Zee5, Voot Select, Voot Kids, Sun NXT, HoiChoi, Discovery +, Uviversal +, Alt balaji, Eros Now, Lionsgate Play, Shemaroome, JioCinema, JioSaavn OTT Apps ऑफर केल्या जात आहेत. जिओ फायबरमध्ये 399 रुपयांपासून रिचार्ज प्लॅन सुरू होतात. 399 ते 8499 रुपयांपर्यंतचे रिचार्ज प्लॅन आहेत. 

जिओचा 2879 रुपयांचा प्लान सर्वाधिक लोकप्रिय 

Jio कडे 2999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे जो 365  दिवसांच्या व्हॅलिडिटीसह आहे. दिवसाला 2.5 GB डेटा मिळतो, म्हणजेच संपूर्ण डेटा 912.5 GB होतो.  बाकी सर्व 2879 रिचार्ज प्लानप्रमाणेच आहे. तर 2545 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 336 दिवस असून त्यात दररोज 1.5 GB डेटा दिला जातो. 2879 रुपयांचा प्लान सर्वाधिक ग्राहकांचा लोकप्रिय आहे.