Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये केलेत बदल, 'हे' आहेत नवीन नियम

Reward Points Policy

Reward Points Policy: SBI आणि HDFC बँकेच्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांना नवीन वर्षात अनेक फायदे मिळणार आहेत.

Reward Points Policy: तुमचे खाते देखील स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI ) किंवा एचडीएफसी बँक(HDFC) मध्ये असेल आणि तुमच्याकडेही या बँकांचे क्रेडिट कार्डही(Credit Card) असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. या बँकांनी नवीन वर्षात बँकेच्या क्रेडिट कार्ड वर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल केला आहे. चला तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

ग्राहकांसाठी नवीन वर्षात केले रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये बदल(Changes in reward points policy)

दोन्ही बँकांनी 1 जानेवारी 2023 पासून क्रेडिट कार्डशी(Credit Card) संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. या अंतर्गत ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक फायदे आणि सुविधा देण्याचा बँकेचा उद्देश आहे. क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या रिवॉर्ड पॉइंट पॉलिसीमध्ये9Reverd Point Policy) बदल करण्यात आला असून यापूर्वी क्रेडिट कार्डद्वारे रेंट भरण्याच्या शुल्काच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. दोन्ही बँकांनी नवीन वर्षात 1 जानेवारी 2023 पासून नवीन नियम लागू केले आहेत. बँकेकडून क्रेडिट कार्ड फी(Fees) आणि रिवॉर्ड पॉइंट प्रोग्राममध्ये बदल केले असल्याने ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे.

काय आहेत नवीन नियम?(What are the new rules?)

  1. क्रेडिट कार्डवरील एकूण रकमेपैकी 1 टक्के रक्कम थर्ड पार्टी मर्चंटद्वारे रेंट पेमेंटवर भरावी लागणार आहे 
  2. बँकेच्या माहितीनुसार, रेंटच्या पेमेंटसाठी सर्व कार्डांवर रिवॉर्ड पॉइंट्स उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत 
  3. शिक्षणाशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत
  4. एचडीएफसीने हॉटेल आणि तिकीट बुकिंगवर रिवॉर्ड पॉइंट सिस्टममध्ये बदल केला आहे
  5. क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध असलेली रिवॉर्ड पॉइंट सिस्टम SBI ने बदलली आहे, एसबीआयच्या म्हणण्यानुसार, ई-कॉमर्स वेबसाईटवरून ऑनलाईन शॉपिंगवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटमध्ये बदल करण्यात आले आहे 
  6. SBI कार्डवर BookMyShow, Cleartrip, Apollo 24X7, EazyDiner, Lenskart आणि Netmeds वर ऑनलाईन खर्चावर 10X रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार आहेत 
  7. SBI ने 15 नोव्हेंबर 2022 पासून प्रोसेसिंग फी चार्ज सुधारित केली आहे. याशिवाय सर्व व्यापारी ईएमआयवर प्रक्रिया शुल्क 199 रुपये + कर केला आहे. हे शुल्क पूर्वी 99 रुपये + कर असे होते