Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance to bid for football club : मुकेश अंबानी आता फुटबॉलच्या मैदानात उतरणार!

Mukesh Ambani, Liverpool FC, Reliance Industries

Reliance to bid for football club : सध्या सगळीकडे फिफा वर्ल्डकप 2022 चे वारे वाहत आहेत. फुटबॉल फिव्हरची भुरळ कॉर्पोरेटला देखील पडली आहे. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी इंग्लिश प्रिमियर लीगमधील एक फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. लिव्हरपूलच्या खरेदीबाबत अंबांनी यांनी ऑफर दिली आहे.

सध्या सगळीकडे फिफा वर्ल्डकप 2022 चे वारे वाहत आहेत. फुटबॉल फिव्हरची भुरळ कॉर्पोरेटला देखील पडली आहे. आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी इंग्लिश प्रिमियर लीगमधील एक फुटबॉल क्लब विकत घेण्याच्या तयारीत आहेत. लिव्हरपूलच्या खरेदीबाबत अंबांनी यांनी ऑफर दिली आहे.

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Chairman, Reliance) हे प्रतिष्ठित इंग्लिश प्रिमियर लीगमधील फुटबॉल क्लब लिव्हरपूल एफसी (Liverpool Football Club) खरेदी करण्यासाठी मैदानात उतरल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. रिलायन्सच्या अध्यक्षांनी लिव्हरपूल (Liverpool Football Club) टेकओव्हरसंदर्भात चौकशी केली आहे. लिव्हरपूल एफसीचे सध्याचे मालक फेनवे स्पोर्ट्स ग्रुपने (Fenway Sports Group) 4 अब्ज ब्रिटिश पौंडांच्या म्हणजेच तब्बल 38 हजार कोटी रुपये किंमतीसह विक्री करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. एफएसजीने 2010 मध्ये लिव्हरपूल एफसी विकत घेतले. पीटीआयच्या वृत्तानुसार, मॉर्गन स्टॅनली आणि गोल्डमन सॅक्स यांना एफएसजीने मेगा सेलमध्ये मदत करण्यासाठी नियुक्त केले आहे.

2010 मध्येही बोली लावली होती (The Bid Was Also Made In 2010)

मिळालेल्या वृत्तानुसार लिव्हरपूल एफसीची (Liverpool FC) मालकी सध्या फेनवे स्पोर्ट ग्रुपकडे (FSG) आहे. फेनवे स्पोर्ट ग्रुप सध्या लिव्हरपूल एफसी विकण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे 4 अब्ज पौंड म्हणजेच जवळपास 38 हजार कोटी रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी 2010 मध्ये मुकेश अंबानी यांनी सहारा ग्रुपचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्याबरोबर मिळून लिव्हरपूल फुटबॉल क्लबची मालकी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी फेनवे स्पोर्ट ग्रुपने बाजी मारली होती.

अंबानी यांची एकूण संपत्ती 7.6 लाख कोटी (Mukesh Ambani's Total Wealth)

मुकेश अंबानी हे आशियातील तसेच देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अंबानी यांची एकूण संपत्ती 7.6 लाख कोटी आहे. इंग्लंडमधील प्रसिद्ध फुटबॉल क्लबचे मालक होण्यासाठी अंबानींना मिडल इस्ट आणि आणि यूएसमधील इतर गुंतवणूकदारांबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे.

अंबानी कुटुंबाचे क्रिडाप्रेम (The Ambani family's Love for Sports)

मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय हे क्रिडाप्रेमी असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी अंबानी कुटुंबियांनी क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये आपले योगदान दिले आहे. 2008 मध्ये मुकेश अंबानींनी मुंबई इंडियन्स या क्रिकेट संघाची निर्मिती केली. सध्या ते तीन देशात 3 टी-ट्वेन्टी संघांचे मालक आहेत. यामध्ये बीसीसीआयच्या आयपीएल संघाचे मालक, अमिरात क्रिकेट बोर्डाच्या यूएई टी-ट्वेन्टी लीग आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-ट्वेन्टी लीगमधील एका संघाचे मालकी हक्क अंबानी यांच्याकडे आहेत. याशिवाय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे मुकेश अंबानी पार्टनर आहेत. त्याचप्रमाणे रिलायन्सतर्फे इंडियन सुपर लीग फुटबॉलचे सुद्धा आयोजन केले जाते.