आजकाल सर्व काही क्रेडिटवर केले जाते. हे एक प्रकारे कर्ज आहे. बँका (Bank), एनबीएफसी, फायनान्स अॅप्स (Finance Apps) खुल्या हाताने कर्ज वाटप करण्यास तयार आहेत. ते आमच्या प्रत्येक छोट्या गरजांसाठी कर्ज देतात. यामुळेच सर्वजण कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. अशा परिस्थितीत कर्ज घेताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण जास्त कर्ज झाल्यास तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. ईएमआयचा (EMI) भार इतका वाढतो की तुमच्या कष्टाने कमावलेले बहुतेक पैसे ते भरण्यासाठी जातात. यानंतर संपूर्ण महिना तणावात जातो.
बॅड लोनपासून सावध
आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की काही कर्जे अशी असतात की एकतर तुमची नेट वर्थ वाढते किंवा तुम्ही त्यातून वॅल्यू अँडिशन करता. उदाहरणार्थ, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्ज. दुसरीकडे पर्सनल लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड लोन आणि कंज्युमेबल लोन हे तुमचे टेन्शनमध्ये भर घालतात.
ईएमआय कमाईच्या कमाल 40% असावा
तज्ज्ञ म्हणतात की ईएमआय तुमच्या कमाईच्या जास्तीत जास्त 40 टक्के असावा. याचा अर्थ, जर तुमचे उत्पन्न दरमहा 50 हजार रुपये असेल, तर प्रत्येक महिन्याचा ईएमआय 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे कर्ज काळजीपूर्वक घ्या. जोश आणि उत्साहात कर्ज घेणे टाळा.
बॅड लोन टाळा
जर तुमचे उत्पन्न वाढले तर तुम्ही गरजेनुसार कर्जाचं ओझं वाढवू शकता. गुड लोनचा वाटा जास्त असावा याची विशेष काळजी घ्या, कारण ती संपत्ती निर्माण करण्यात मदत करते. बॅड लोन टाळण्याचा प्रयत्न करा.
एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड टाळा
कर्जाचा विचार केला तर त्यात क्रेडिट कार्डचा मोठा वाटा आहे. जर क्रेडिट कार्डचा वापर योग्य आणि स्मार्ट पद्धतीने केला गेला तर ती खूप उपयुक्त गोष्ट आहे. त्याचा गैरवापर झाला तर व्याजदर खूप जास्त असतो. अशा परिस्थितीत एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे टाळा. क्रेडिट कार्डने कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
ईएमआय पेमेंटमध्ये उशीर नको
बँकेचे कर्ज असो किंवा क्रेडिट कार्डचा ईएमआय, ते वेळेवर भरणे फायदेशीर ठरते. ईएमआय चुकल्यास मोठा दंड भरावा लागेल. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवरही परिणाम होतो.
आपत्कालीन निधी तयार करा
अचानक कोणतीही आर्थिक गरज निर्माण झाली तर त्यासाठी प्रत्येकाने आपत्कालीन निधी तयार करावा, असा सल्ला आर्थिक तज्ज्ञ देतात. आपत्कालीन निधी सहा महिन्यांच्या तुमच्या गरजेइतका असावा. आपत्कालीन निधीमध्ये लिक्विडिटी असणे आवश्यक आहे. आपत्कालीन निधी म्हणून बँक एफडी, आरडी किंवा काही रोख ठेवू शकतात.