Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note: 2 हजाराची नोट बदलण्यापूर्वी RBI ने बँकांना दिलेले निर्देशही वाचा...

2000 Note: 2 हजाराची नोट बदलण्यापूर्वी RBI ने बँकांना दिलेले निर्देशही वाचा...

रिझर्व बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयाच्या नोटा यापुढे चलनात नसतील असे जाहीर केले आहे. नोटा चलनात नसल्या तरी त्याची वैधता मात्र राहणार आहे हे सर्व नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.

आरबीआयने जसे एक निवेदन प्रकाशित करून सामान्य नागरिकांना आणि माध्यमांना 2000 रुपयांच्या नोटेबाबत माहिती दिली तशीच माहिती त्यांनी देशभरातील बँकांना देखील दिली आहे.

2016 साली झालेल्या नोटबंदीनंतर देशात अभूतपूर्व अशी परिस्थिती उद्भवली होती. अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी मात्र आरबीआयने बँकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

येत्या 23 मे पासून तुम्ही बँकेत जाऊन 2000 रुपयाच्या नोटा जमा करू शकता. RBI ने बँकांना दिलेले निर्देश खालीलप्रमाणे:

₹2000 च्या नोटा जमा करण्याची आणि/किंवा बदलण्याची सुविधा सर्व सार्वजनिक बँकामध्ये सर्वांसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत उपलब्ध असेल.

सर्व बँकांमध्ये नागरिक कुठल्याही निर्बंधांशिवाय त्यांच्या खात्यांमध्ये ₹2000 च्या नोटा नेहमीच्या पद्धतीने जमा किंवा बदली करू शकतात. बँकांना काही संदिग्धता आढळल्यास त्या खातेदारांचे केवायसी कागदपत्रे मागू शकतात. बँकांनीही खातेदारांना कुठलाही त्रास होणार नाही याची खात्री करायची आहे.

₹2000 च्या नोटा बदलण्याची सुविधा सर्व बँकांद्वारे,त्यांच्या शाखांद्वारे जनतेला प्रदान केली जाईल, याची काळजी घ्यायची आहे.

लोकांची गैरसोय कमी करण्यासाठी, सर्वांना चलन भरण्याची संधी मिळावी यासाठी एका वेळी ₹20,000/- रुपये बँकेत जमा केले जाऊ शकतात. म्हणजेच एकावेळी ₹2000 च्या 10 नोटा जमा करता येणार आहेत किंवा बदलता येणार आहेत.

बँकांनी त्यांची इतर कामे नेहमीप्रमाणे करायची आहेत. त्यात कुठलाही व्यत्यय येणार नाही आणि खातेदारांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बिझनेस करस्पॉन्डंट (BC) यांना ₹4000/- च्या मर्यादेपर्यंत ₹2000 च्या नोटा बदलण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते.

नागरिकांनी बँकांना पूर्वतयारी व्यवस्थेसाठी वेळ द्यावा, यासाठी आरबीआयने जनतेला विनंती केली असून, सहकार्य करण्याचे अपील केले आहे.

दुर्गम भागात जिथे जवळपास बँक नसेल, अशा ठिकाणी नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा देऊ शकतात. नागरिकांनी तशी विनंती केल्यास व बँकेकडे तशी तजवीज असल्यास मोबाईल व्हॅन उपलब्ध होऊ शकते.

जन धन योजना खाते / मूलभूत बचत बँक ठेव ( Basic Savings Bank Deposit) मध्ये ₹ 2000 च्या नोटांचे मूल्य जमा करताना नेहमीच्या मर्यादा लागू होतील. वरिष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती, महिला यांची गैरसोय होऊ नये यासाठी बँकांनी शक्य तितक्या विशेष व्यवस्था करायच्या आहेत.