What Happen With Fixed Deposite : आतापर्यंत अधिकाधिक लोकांना असे वाटत होते की, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढविले तर, फिक्स्ड डिपॉजिट वरील देखील व्याज वाढेल. मात्र अश्या लोकांच्या हातात, यावेळी केवळ निराशाच लागली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने आपल्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक(MPC) घेऊन 6.5 टक्के रेपो रेट कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु याआधी 11 महिन्यांच्या आत रेपो दरात एकुण 2.5 टक्के वाढ झाली होती. त्याचा लाभ काय खरोखरचं बँकांनी एफडी गुंतवणूकदारांना होऊ दिला की नाही ते बघुया.
एफडी गुंतवणूकदारांच्या मनात प्रश्न
मात्र आता बँकेत एफडी जमा करणाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहेत की, एफडीचे व्याजदर वाढीच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचले आहेत की, व्याजदर वाढायला आणखी काही वेळ लागेल? याबाबत तज्ञांचे मत देखील वेगवेगळे आहेत. परंतु एफडी मध्ये गुंतवणूक करण्यास सध्या योग्य वेळ आहे. कारण इतर सगळ्याच बाबतीत व्याजदर हे प्रचंड वाढलेले आहे. त्यातच किरकोळ महागाई खूप जास्त असल्याने आरबीआयने आधी दर वाढवले. आधी डिसेंबर 2022 मध्ये महागाई दर 6 टक्क्यांच्या खाली घसरल्यानंतर, किरकोळ महागाई दर फेब्रुवारी 2023 मध्ये पुन्हा 6.44 टक्क्यांपर्यंत वाढले. रिझव्र्ह बँकेला हे दर सहा टक्क्यांच्या खाली राहण्याची अपेक्षा होती. मात्र, जोपर्यंत महागाई कायमस्वरूपी खाली येत नाही, तोपर्यंत रेपो दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बँक ग्राहकांनी देत नाहीत पूर्ण लाभ
जेव्हा जेव्हा रेपो दर वाढतो, तेव्हा बँका त्यांच्या कर्जदारांवर व्याज दर वाढीचा बोजा टाकण्यास फारसा उशीर करत नाहीत. आणि ज्यांनी फ्लोटिंग रेटवर कर्ज घेतले आहे, त्यांच्या पासुन बँकांना अधिक फायदा होतो. मात्र तरीदेखील एफडी गुंतवणुकदारांना त्याचे फायदे देण्यात बँका टाळाटाळ करतात. RBI डेटा दर्शवितो की, एप्रिल 2022 मध्ये एक वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या FD साठी सर्वात कमी आणि सर्वोच्च व्याजदर अनुक्रमे 5% ते 5.60% होते. तेव्हापासून, 24 मार्च 2023 च्या आकडेवारीनुसार, सर्वात कमी व्याजदर एक टक्क्याने आणि जास्तीत जास्त सहा टक्क्यांनी वाढला आहे आणि सर्वोच्च व्याजदर 1.65% ते 7.25% वाढला आहे.
एफडी दर आणखी वाढू शकतात का?
ज्या बँका जास्त व्याजदर देत आहेत, त्या केवळ एक ते तीन वर्षांच्या एफडीसाठी देत आहेत. उदाहरणार्थ, कोटक महिंद्रा बँक 390 दिवस (12 महिने 25 दिवस) ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सामान्य नागरिकांसाठी 7.2% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.7% परतावा देते. युनियन बँक ऑफ इंडिया 800 दिवस आणि तीन वर्षांच्या दोन विशिष्ट कालावधीत 7.30% चा सर्वोत्तम परतावा देते. म्हणजेच एफडीचे दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरी बँकांनी रेपो दर वाढीनुसार आपले एफडी रेट वाढविले नाहीत, तरी अद्यापही महागाईची टांगती तलवार डोक्यावर कायम आहे. तसेच जून महिन्यात होणाऱ्या MPC च्या बैठकीत परत रेपो रेट वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि तेव्हा बँका देखील एफडीवरील व्याज दर वाढविण्यास नकार देऊ शकणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एफडी मध्ये गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे, असे म्हणटल्यास वावगे ठरणार नाही.