Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ratan Tata: रतन टाटांच्या वडिलांना अनाथआश्रमातून दत्तक घेतलं होत! काय करतात रतन टाटांचे सावत्र भाऊ? जाणून घ्या!

Ratan Tata

Image Source : www.indiatimes.com

जमशेदजी टाटा यांनी व्यापार क्षेत्रात आपली नवी आणि स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. परंतु रतन टाटा हे मूळ टाटा कुटुंबातील नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर जाणून घ्या.

भारतातील टाटा उद्योग समूहाची जबाबदारी रतन टाटा सांभाळत आहेत. आपल्या मृदू आणि नम्र स्वभावामुळे रतन टाटा जगभरात ओळखले जातात. तरुणांमध्ये त्यांची आणि त्यांच्या कामाबद्दल क्रेझ आहे. टाटा उद्योग समुहाचे संस्थापक म्हणून जमशेदजी टाटा ओळखले जातात. पारसी कुटुंबात जन्मलेल्या जमशेदजींनी व्यापार क्षेत्रात आपली नवी आणि स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली. परंतु रतन टाटा हे मूळ टाटा कुटुंबातील नाहीत, हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर जाणून घ्या.

रतन टाटा यांच्या वडिलांना घेतले होते दत्तक 

जमशेदजी टाटा यांना 2 मुले होती. दोराबजी आणि रतनजी. रतन टाटा यांचे नाव त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच रतनजी टाटा यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. रतनजी आणि त्यांच्या पत्नीने नवाजबाईंनी एका अनाथआश्रमातून एका मुलाला दत्तक घेतले होते. या मुलाचे नाव होते नवल. नवल यांना दत्तक घेतले तेव्हा त्यांचे वय होते 13 वर्षे. सुरतमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. वडिलांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांना अनाथआश्रमात राहावे लागत होते. पुढे त्यांच्याच नात्यातील रतनजी टाटा आणि त्यांची पत्नी नवाजबाई या दांपत्यांनी नवल यांनी दत्तक घेतले होते.

रतन टाटा यांचा जन्म 

नवल टाटा हे टाटा कुटुंबाचा एक महत्वाचा घटक बनले. परिवाराची, व्यवसायाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. परदेशातून उच्चशिक्षण घेऊन आल्यावर त्यांचे लग्न सुनू यांच्याशी झाले. सुनू आणि नवल टाटा यांना 2 आपत्ये झाली. पहिल्या मुलाचे नाव त्यांनी वडिलांच्या नावे, म्हणजेच रतनजी टाटा यांच्या नावे ‘रतन’ असे ठेवले. दुसऱ्या मुलाचे नाव जिमी असे ठेवले. जिमी टाटा हे सध्या मुंबईतील कुलाबा येथे 2 BHK सदनिकेत सामान्य जीवन जगत आहेत. नुकताच रतन टाटा यांनी जिमी टाटा यांच्यासोबतचा लहानपणीचा फोटो सोशल मिडीयावर टाकत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

कालांतराने रतन टाटा यांचे आई-वडील विभक्त झाले आणि त्यांच्या वडिलांनी स्वित्झर्लंडमधील सिमोन नामक महिलेशी लग्न केले. तिच्यापासून त्यांना एक मुलगा झाला. तो मुलगा म्हणजे नोएल टाटा. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू असून ते टाटा इंटरनॅशनल, ट्रेंट, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या टाटा समूहाच्या चार कंपन्यांचे अध्यक्ष आणि टायटनचे उपाध्यक्ष आहेत. दिवंगत सायरस मिस्त्री हे नोएल टाटा यांचे मेव्हणे होते.

noel-tata.jpg

आज टाटा उद्योग समूहाची ओळख असलेले रतन टाटा आणि नोएल टाटा आपली स्वतंत्र ओळख जपून आहेत. दत्तक घराण्यातून आलेले नवल टाटा यांचे विचार आणि वारसा तसेच जमशेदजी टाटा यांची समाजसेवी वृत्ती जपण्याचा दोघेही प्रयत्न करताना दिसतात.