Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ratan Tata Birthday: शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा 'रतन टाटा'!

Ratan Tata Birthday

Image Source : http://www.india.com/

Ratan Tata Birthday: भारतातील सर्वात प्रसिद्ध उदयोगपतींपैकी एक नाव घेतले जाते, ते म्हणजे उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. आज यांच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशात त्यांनी विस्तारलेल्या उद्योगांबाबत जाणून घेऊ.

Tata Brands: टाटा समूह देशात आणि जगात 30 कंपन्यांसह कार्यरत आहे. त्याचा व्यवसाय 100 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. 30 कंपन्यांच्या मदतीने टाटा समूह किती पसरला आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात.

 ग्राहक आणि किरकोळ (Consumer and Retail)

ग्राहक आणि किरकोळ क्षेत्रात, टाटा समूहाच्या कंपन्या ग्राहकोपयोगी वस्तूंपासून ते चहा आणि पॅकेज पाण्यापर्यंतच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. टाटा केमिकल्स, टाटा ग्राहक उत्पादने, व्होल्टास, टायटन, इन्फिनिटी रिटेलचा क्रोमा ब्रँड, ट्रेंटचा स्टार बाजार हे काही प्रमुख ब्रँड आहेत. ट्रेंटच्य ब्रँड्समध्ये वेस्टसाइड, ज्युडिओ, लँडमार्क यांचा समावेश आहे. तनिष्क हा टायटनचा ज्वेलरी ब्रँड आहे. टाटा ग्राहक उत्पादनांबद्दल बोलायचे तर, टाटा टी, टाटा सॉल्ट, टाटा संपन हे ब्रँड आहेत.

पर्यटन व प्रवास (Tourism and Travel)

टाटा समूह 1903 पासून प्रवास व पर्यटन उद्योगात आहे. ताजमहाल हॉटेलची स्थापना 1903 मध्ये झाली. हॉटेल उद्योगात हा समूह इंडियन हॉटेल्स कंपनीच्या माध्यमातून काम करतो. टाटा समूहानेच टाटा एअरलाइन्स म्हणून एअर इंडिया सुरू केली. एअर इंडियाचे 1956 मध्ये राष्ट्रीयीकरण झाले आहे. कदाचित एअर इंडिया पुन्हा टाटांची होण्याची शक्यता आहे.

दूरसंचार आणि मीडिया (Telecommunication and Media)

टाटा समूह टाटा कम्युनिकेशन्स, टाटा स्काय आणि टाटा टेलिसर्व्हिसेसच्या माध्यमातून या क्षेत्रात कार्यरत आहे. जगातील 70 टक्क्यांहून अधिक टेलिकॉम कंपन्या टाटा कम्युनिकेशन्सचे नेटवर्क वापरतात. जगातील 25 टक्क्यांहून अधिक इंटरनेट मार्ग टाटा कम्युनिकेशन्सच्या नेटवर्कवर आहेत. कंपनीकडे जगातील सर्वात मोठे पाणबुडी फायबर नेटवर्क देखील आहे.

माहिती तंत्रज्ञान (Information Technology)

आयटी सेवांमध्ये, टाटा समूह टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या मदतीने काम करतो. TCS च्या नेतृत्वाखाली समूहाच्या IT कंपन्या जगभरात कार्यरत आहेत. टाटा समूहातील निम्म्याहून अधिक कर्मचारी TCS शी संबंधित आहेत. ती शेअर बाजारात सूचीबद्ध आहे आणि मार्केट कॅपच्या बाबतीत भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

शैक्षणिक संस्था (Educational institutions)

टाटा समूहाच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थाही आहेत. जसे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स इ. टाटा डिजिटलच्या माध्यमातून ई-कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्याची टाटाची योजना आहे.