Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ratan Tata Birthday Today: तब्बल 50 हून अधिक कंपन्यांचे मालक तरीही श्रीमंतांच्या यादीत रतन टाटा नाहीत कारण...

Ratan Tata Birthday Today

Image Source : www.rediff.com

Ratan Tata Birthday Today: भारतीय उद्योग जगतातील ऋुषितुल्य व्यक्तिमत्व असलेल्या रतन टाटा यांचा आज 85 व्या जन्मदिवस आहे. रतन टाटा हे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष आहेत. टाटा ग्रुपमधील सक्रिय सहभागातून बाहेर पडलेले रतन टाटा मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतात.

तब्बल 50 हून अधिक कंपन्यांची मालकी आणि जवळपास 10 लाख कोटींची उलाढाल (128 बिलियन डॉलर्स) असलेल्या टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचा आज 28 डिसेंबर 2022 रोजी 85 वा वाढदिवस आहे. टाटा ग्रुपमध्ये सक्रीय सहभाग नसला तरी स्टार्टअप्समधील गुंतवणूक असो किंवा सोशल मिडीया हॅंडलवरुन केलेली ट्विट्स असोत रतन टाटांना सर्वच स्तरातून मानसन्मान मिळतो. इतक्या अफाट उद्योग घराणेचे प्रमुख असून देखील रतन टाटा यांचे नाव कधी श्रीमंत उद्योजकांच्या स्पर्धेत दिसत नाही. हजारो कोटींच्या संपत्तीबाबत कधीच गाजावाजा न करता आपले काम करत राहणे, हीच शिकवण रतन टाटा यांनी नव्या पिढीला दिली आहे. (Emeritus Chairman of Tata Sons is not among world’s richest persons)

IIFL Wealth Hurun India Rich List 2022 नुसार रतन टाटा यांची एकूण संपत्ती 3800 कोटी इतकी आहे. (Ratan Tata has a net worth of Rs.3800 Crore) श्रीमंत भारतीय उद्योजकांच्या यादीमध्ये रतन टाटा हे 421 व्या स्थानी आहेत. 2021 मध्ये याच यादीतमध्ये रतन टाटा 433 व्या स्थानी होते. तेव्हा त्यांच्याकडे 3500 कोटींची संपत्ती होती.

रतन टाटा यांच्या संपत्ती 2022 मध्ये 300 कोटींची वाढ झाली. टाटा यांनी अनेक स्टार्टअप्समध्ये अॅंजल इन्व्हेस्टर म्हणून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. चालू वर्षात रतन टाटा यांच्या ट्विटर फॉलोअर्समध्ये देखील तब्बल 18 लाखांची वाढ झाली.

रतन टाटा केवळ उद्योजक म्हणून कॉर्पोरेट क्षेत्राला परिचित नाहीत तर त्यांच्यात एक संवेदनशील दाता देखील दडलेला आहे. टाटा सन्सअंतर्गत टाटा कंपन्यांमधून मिळणाऱ्या नफ्यापैकी 66% निधी रतन टाटा समाज कार्यासाठी खर्च करतात. यात शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती अशा क्षेत्रात टाटा ट्रस्टकडून अर्थ सहाय्य केले जाते. त्यामुळे रतन टाटा यांच्या संपत्तीतील मोठा वाटा दानधर्म आणि समाजकार्यासाठी खर्च होतो. परिणामी इतर उद्योजकांप्रमाणे टाटा यांच्या संपत्तीमध्ये हजारो कोटींची वाढ होत नाही. ती एका ठराविक मर्यादेत राहते. 

मिठापासून विमान सेवेपर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहातील 29 कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. 31 मार्च 2022 अखेर या कंपन्यांचे बाजार भांडवल 23.6 लाख कोटी रुपये इतके आहे. टाटा समूहाची एकूण उलाढाल 128 बिलियन डॉलर्स इतकी असून 9 लाख 35 हजारांहून अधिक कर्मचारी भारतासह वेगवेगळ्या देशांत टाटांसाठी काम करतात.