शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे बादशाह राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. मृत्यूसमयी त्यांचा शेअर बाजारातला पोर्टफोलिओ 30,000 कोटी रुपये इतका होता. झुनझुनवाला यांची शेअर्स गुंतवणूक आणि स्थावर जंगम मालमत्ता अशी एकूण संपत्ती जवळपास 50,000 कोटी इतकी होती. या संपत्तीचे वारसदार आणि त्याबाबत भविष्यात निर्णय कोण घेणार याची तरतूद झुनझुनवाला यांनी मृत्यूपत्रात केली आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूपत्राचा तपशील समोर आला आहे.ज्यात त्यांनी पत्नी रेखा झुनझुनवाला आणि विश्वासू मित्रांचा उल्लेख केला आहे. (Rakesh Jhunjhunwala name closed friends name in his will as executors of his estate)
झुनझुनवाला यांनी पत्नी रेखा आणि तीन मुले तसेच धर्मदाय कामासाठी (Charity)मृत्यूपत्रात तरतूद केली आहे.झुनझुनवाला नेहमीच आपल्या आक्रमक पण अभ्यासपूर्ण गुंतवणुकीसाठी परिचत होते.त्यांनी त्यांच्या संपत्तीचे देखील नियोजन करुन ठेवले आहे.झुनझुनवाला यांची दक्षिण मुंबईतील मलबार हिलमध्ये निवासी इमारत आहे.जी त्यांनी स्टॅंडर्ड चॅटर्ड बँकेकडून 2013 मध्ये 176 कोटींना खरेदी केला होता. त्याशिवाय लोणावळामध्ये त्यांचा एक अलिशान बंगला देखील आहे. या बंगल्यात जाकुझी, स्विमिंग पूल, डिस्कोथेक आहेत.
झुनझुनवाला यांनी मृत्यूपत्रात पत्नी रेखा झुनझुनवाला, भाऊ राजीव देसाई, पुतण्या विशाल गुप्ता यांचा उल्लेख केला आहे. राकेश झुनझुनवाला यांचे जवळचे मित्र वकिल बर्जिस देसाई यांच्यावर संपत्ती वाटपाची जबाबदारी सोपवली आहे. मृत्यूपत्र तयार करण्यात देसाई यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. पत्नी आणि तीनही मुलांसाठी झुनझुनवाला यांनी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करुन त्यात हजारो कोटींची तरतूद केल्याचे बोलले जाते. रेखा झुनझुनवाला, निष्ठा झुनझुनवाला, आर्यमन झुनझुनवाला आणि आर्यवीर झुनझुनवाला शिवाय धर्मदाय कामांसाठी एक वेगळी ट्रस्टची तरतूद झुनझुनवाला यांनी मृत्यूपत्रात केली आहे. या सर्व ट्रस्टमध्ये राधाकिशन दमानी,विशाल गुप्ता, बर्जिस देसाई, उत्पल शेठ आणि अमित गोएल या ट्रस्टींचा समावेश आहे.
गुंतवणूकविषयक निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना (Rakesh Jhunjhunwala form Committee)
राकेश झुनझुनवाला यांनी जवळपास 36 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांचा एकूण पोर्टफोलिओ 30,000 कोटींचा आहे. त्याशिवाय अकास एअरलाईन्स या कंपनीत झुनझुनवाला मुख्य गुंतवणूकदार होते. नुकताच अकासा एअरलाईन्सची सेवा सुरु झाली.या गुंतवणुकीविषयी भविष्यात निर्णय घेण्यासाठी झुनझुनवाला यांनी एक समिती तयार केल्याचे मृत्यूपत्रातून समोर आले आहे. राकेश झुनझुनवाला यांचे गुंतवणूक गुरु राधाकिशन दमानी, कल्पराज धरमशी आणि अमल पारेख या तीन मित्रांचा या समितीमध्ये समावेश आहे. ही समिती झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओबाबत निर्णय घेणार आहे.
Image Source : Twitter