ज्यांच्या केवळ वक्तव्याने शेअर बाजाराची दिशा बदलते, असे भारतातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले. (Rakesh Jhunjhunwala Passed Away) मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात वयाच्या 62 वर्षी झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत. झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 5.8 बिलियन डॉलर्स (जवळपास 43.39 कोटी) इतकी आहे. फोर्ब्सच्या श्रीमंत भारतीयांच्या यादीत झुनझुनवाला ३६ व्या स्थानी होते. झुनझुनवाला यांच्या निधनाने वित्तीय सेवा क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून झुनझुनवाला यांची प्रकृती नाजूक बनली होती. काही सार्वजनिक कार्यक्रमात ते व्हीलचेअरवर दिसून आले होते. झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मागील काही वर्षांत शेअर बाजारात प्रचंड गुंतवणूक केली आहे. टायटन, स्टार हेल्थ यासारख्या कंपन्यांमध्ये झुनझुनवाला प्रवर्तक आहेत.
37 वर्षात 5000 रुपयांचे 43 हजार कोटी केले
राकेश झुनझुनवाला यांची कहाणी एखाद्या पटकथेला शोभेल अशीच आहे. झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेले अनेक शेअर या काळात मल्टीबॅगर ठरले.
- 1985 मध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक करत त्यांनी शेअर बाजारात प्रवेश केला होता.1986 मध्ये पहिल्यांदा त्यांनी नफा कमावला. टाटा टी या शेअरवर त्यांनी तीनपट नफा कमावला होता. टाटा टीचे 5000 शेअर 43 रुपये भावाने खरेदी केले होते. तीन महिन्यांत हा शेअर जबरदस्त वाढला. झुनझुनवाला यांनी 143 रुपयांत शेअरची विक्री केला आणि जोरदार नफा कमावला होता.
- मागील 9 वर्षात झुनझुनवाला यांच्या एकूण संपत्तीत 4 पटीने वाढ झाली आहे. 2013 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 10.26 हजार कोटी इतकी होती. 2022 मध्ये 46.18 हजार कोटी इतकी वाढली.
- झुनझुनवाला यांनी विमान कंपनीची स्थापना केली. नुकताच त्यांच्या उपस्थिती अकासा एअरलाईन्स या कंपनीने सेवा सुरु केली होती.
- टायटन, स्टार हेल्थ, मेट्रो बॅंड, टाटा मोटर्स आणि क्रिसिल या पाच शेअरमध्ये झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक आहे.
- झुनझुनवाला यांचा शेअरमंत्र हा नवीन गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक ठरत होता.
राकेश झुनझुनवाला यांचा परिचय
जन्म 5 जुलै 1960
शिक्षण : चार्टर्ड अकाउंटंट
नेटवर्थ : 43.39 हजार कोटी
पत्नी : रेखा झुनझुनवाला
मुलगी : निशा झुनझुनवाला
मुले : आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला
image source - https://bit.ly/3zUNHfn