लेटेस्ट कॉर्पोरेट शेअर होल्डिंग अनुसार, राकेश झुनझुनवाला अॅण्ड असोसिएटकडे (Rakesh Jhunjhunwala Associate) सार्वजनिकरीत्या 33 शेअर्स आहेत. ज्याचे मूल्य 25,842.3 कोटी रूपये इतके आहे. शेअर मार्केटमधील बिग बूल राकेश झुनझुनवाला हे आज 5 जुलै, 2022 रोजी त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील टॅक्स ऑफिसर होते. त्यांनी 1985 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असतानाच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) अंदाजे 150 अंकावर होता आणि त्यावेळी झुनझुनवाला यांनी 5 हजार रूपयांनी गुंतवणूक करण्यास सुरूवात केली होती.
फोर्ब्सकडे उपलब्ध असलेल्या माहिती अनुसार, राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची आजच्या घडीला एकूण संपत्ती 5 बिलियन डॉलर (39,527 कोटी रूपये) एवढी आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा क्रमांक 438 वा आहे. एक वर्षापूर्वी त्यांची संपत्ती 4.6 बिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनात 34,387 कोटी रूपये एवढी होती. म्हणजेच एका वर्षात त्यांच्या संपत्तीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी टाटा टी (Tata Tea) मध्ये सर्वप्रथम 5 लाख रूपयांचा फायदा मिळवला होता. त्यांनी त्यावेळी टाटा टी कंपनीचे 5 हजार शेअर्स, प्रति शेअर 43 रूपयांना खरेदी केले होते. ज्याची किंमत 3 महिन्यांनी वाढून 143 रूपये झाली होती.
33 स्टॉकचे बाजारमूल्य 25 हजार कोटीहून अधिक
लेटेस्ट कॉर्पोरेट शेअर होल्डिंग अनुसार, राकेश झुनझुनवाला अॅण्ड असोसिएटकडे सार्वजनिकरीत्या 33 शेअर्स आहेत. ज्याचे मूल्य 25,842.3 कोटी रूपये इतके आहे. ट्रेंडलाईन अनुसार, यात टायटन कंपनी, टाटा मोटर्स, स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्श्युरन्स कंपनी, मेट्रो बॉण्ड्स, फोर्टीस हेल्थकेअर, नजरा टेक्नोलॉजी, फेडरल बॅंक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स यासारख्या शेअर्सचा समावेश आहे.
अक्सा एअरलाईन लवकरच भरारी घेणार!
राकेश झुनझुनवाला यांनी अक्सा एअरवेजच्या माध्यमातून हवाई क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. या आठवड्याभरात अक्सा एअरवेजच्या उड्डाणाचे परीक्षण केले जाणार आहे. त्यानंतर त्याला व्यावसायिक उड्डाणे करण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्सा एअरवेजचे उड्डाण होण्याची शक्यता आहे.
image source - https://bit.ly/3nFizL7