Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sangli Market Yard News: राजापुरी हळदीला क्विंटलमागे 10,100 रुपये दर, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sangli Market Yard

Image Source : www.indiamart.com

Sangli Market Yard News: सांगली मार्केट यार्डामध्ये हळदीच्या सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी 5,000 ते 10,100 रुपये व सरासरी 7,500 रुपये इतका दर मिळाला. या हळदीच्या सौद्यामध्ये 862 पोत्यांची यशस्वी विक्री झाली.

Sangli Market Yard News: सांगली मार्केट यार्डामध्ये मंगळवारी(31 जानेवारी) नवीन हळद सौद्यासाठी सुरुवात झाली. जिल्हा पुरवठा अधिकारी आशीष बारकुल यांच्या हस्ते नवीन राजापुरी हळदीच्या सौद्याचा शुभारंभ करण्यात आला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये 862 पोती राजापुरी हळदीची आवक पाहायला मिळाली. या हळदीला प्रति क्विंटल 10,100 रुपये ते 7,500 रुपये दर मिळाला. पहिल्याच सौद्यात शेतकऱ्यांना चांगला दर  मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी झाले आहे. भविष्यातही हळदीचा दर तेजीत असेल, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तवला आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

862 पोत्यांची यशस्वी विक्री

नवीन हळद सौद्याचा शुभारंभ मे. गणपती जिल्हा कृषि औद्योगिक सह सोसायटी प्लॉट नं. 1 या दुकानातून करण्यात आला. या दुकानामधील हळद सौद्यामध्ये तासगाव तालुक्यातील पेड गावचे शेतकरी विनोद शिवाजी शेंडगे यांची असून यांच्या राजापूरी हळदीला क्विंटनला 10,100 इतका दर मिळाला. ही हळद मनाली ट्रेंडींग कंपनीने खरेदी केली. या हळदीच्या सौद्यासाठी क्विंटलला कमीत कमी 5,000 ते 10,100 रुपये व सरासरी 7,500 रुपये इतका दर मिळाला. या हळदीच्या सौद्यामध्ये 862 पोत्यांची विक्री झाली.

या सौद्यासाठी उपस्थित कोण होत?

या हळद सौद्यासाठी बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, शरद शहा अध्यक्ष चेंबर ऑफ कॉमर्स, अमर देसाई अध्यक्ष अडत संघटना, सतिश पटेल, अध्यक्ष हळद खरेदीदार संघटना, अडते/व्यापारी, मनोहर सारडा, शीतल पाटील, गोपाळ मर्दा, सत्यनारायण अटल, मधूकर काबरा, अभय मगदूम, एन बी पाटील, इत्यादी आडते व्यापारी हळद सौदे विभाग प्रमुख सी. एम. शिंदे व आडते / व्यापारी, हमाल बांधव तोलाईदार व शेतकरी उपस्थित होते. हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली हळद सांगली उत्पादक हळद समितीमध्ये विक्रीसाठी आणावी व  शासनाची हळद/बेदाणा शेतमाल तारण कर्ज योजनेचाही लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक मंगेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांनी केले.