देशातील खासगी क्षेत्रातील पंजाब ॲण्ड सिंध बँकेने (Punjab and Sind Bank) एफडीवरील व्याजदरात बदल (Change FD Interest Rate) केले आहेत. बॅंकेने जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. या बदलानुसार यापुढे 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 2.80% ते 6.25% व्याजदर दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे 400 दिवसांच्या विशिष्ट कालावधीसाठी सामान्य ग्राहकांना 7.10% व्याजदर आणि 601 दिवसांच्या कालावधीसाठी जास्तीत जास्त 7% व्याजदर देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.60% व्याजदर, तर 601 दिवसांच्या कालावधीसाठी 7.50% व्याजदर देण्यात येत आहे. पंजाब ॲण्ड सिंध बँकेने अधिकृतरीत्या प्रसिद्ध केल्यानुसार हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
7 ते 179 दिवसांच्या एफडीवरील व्याजदर जाणून घ्या
पंजाब ॲण्ड सिंध बँक 7 ते 30 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवर ग्राहकांना 2.80% व्याज देत आहे. तसेच 31 ते 45 दिवसाचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मुदत ठेवींवर 3 % व्याज देत आहे. याशिवाय 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर 4.60% आणि 91 ते 179 दिवसांच्या एफडीसाठी 4.75% व्याजदर देत आहे.
180 ते 600 दिवसातील एफडीवर मिळेल 'इतके' व्याज
180 ते 364 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 6% व्याज दिले जात आहे. 1 वर्ष ते 399 दिवसांच्या कालावधीतील एफडीसाठी बँक ग्राहकांना 6.40% व्याजदर देत आहे. याशिवाय 400 दिवसांच्या विशेष कालावधीसाठी बँक सामान्य ग्राहकांना 7.10% व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना 400 दिवसांच्या विशिष्ट कालावधीसाठी 7.60% व्याजदर मिळत आहे.
401 ते 554 दिवसांच्या एफडीवर 6.40% व्याजदर बँकेकडून देण्यात येत आहे. तसेच 555 दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मुदत ठेवीवर कमाल व्याजदर सध्या 7.35% देण्यात येत आहे , तर 556 दिवस ते 600 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 6.40% व्याजदर दिला जात आहे.
601 दिवसांच्या एफडीसाठी विशेष व्याजदर
601 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 7% व्याज मिळत असून ज्येष्ठ नागरिकांना 7. 50% व्याजदर मिळत आहे, तर 602 दिवस ते 2 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 6.40% व्याज मिळणार आहे. पंजाब ॲण्ड सिंध बँक (PSB) 2 ते 3 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 6.75% व्याजदर देत आहे. 3 ते 10 वर्षांच्या एफडीवर ग्राहकांना 6.25% दराने व्याज मिळणार आहे.
Source: livemint.com